Headlines

मोठी बातमी! ट्रम्प यांचा मोठा विजय, इराणची शेवटी माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज बाबत मोठी घोषणा

मोठी बातमी! ट्रम्प यांचा मोठा विजय, इराणची शेवटी माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज बाबत मोठी घोषणा
मोठी बातमी! ट्रम्प यांचा मोठा विजय, इराणची शेवटी माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज बाबत मोठी घोषणा


अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं होतं, तर दुसरीकडे त्यानंतर अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी लावली. दरम्यान दोन्ही देशांकडून सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे जगातील जे देश कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहेत, त्यांच्यावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. कारण जागला एकूण जेवढं कच्च तेल आणि एलपीजी गॅसची गरज आहे, त्यातील तब्बल 25 टक्के वाहतूक या मार्गाने होते. त्यामुळे हा मार्ग जर लवकर ओपन झाला नाही तर हे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

मात्र याचदरम्यान आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे इरानकडून युद्ध थांबवण्यासाठी आता मेरिकेला नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला वारंवार धमक्या देण्यात येत आहेत, जर इराणने लवकरात लवकर अणु करार केला नाही तर आम्ही पुन्हा इराणवर भीषण हल्ला करणार, आमचं सैन्य तयार आहे, असं ट्रम्प यांनी आपल्या धमकीमध्ये म्हटलं आहे, त्यानंतर आता इराणने दोन पावलं माघार घेतल्याची पहायला मिळत आहे. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने असा दावा केला आहे की, युद्ध थांबवण्यासाठी पुन्हा एकदा इराणकडून नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये इराणने काही अटी ठेवल्या आहेत. ज्यामध्ये म्हटलं आहे की, जर अमेरिकेनं आमच्या या अटी पूर्ण केल्या तर आम्ही युद्ध थांबवू तसेच स्ट्रेट ऑफ होर्मूजचा मार्ग देखील वाहतुकीसाठी ओपन करू, अशी घोषणा देखील इराणकडून आपल्या प्रस्तावात करण्यात आली आहे.

अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी उठवावी, अमेरिकेकडून इतर देशांमध्ये इराणची जी संपत्ती जप्त करण्यात आली आहे, ती मुक्त करावी. तसेच आमचं युद्धात जे नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई आम्हाला द्यावी, अशा अटी इराणने अमेरिकेपुढे ठेवल्या आहेत. तसेच स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू झाल्यानंतर अण्वीक करारावर चर्चा करू असंही इराणने म्हटलं आहे. आता सर्व जगाचं लक्ष अमेरिकेच्या भूमिकेकडे लागलं आहे, अमेरिका काय निर्णय घेणार? हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे. तर दुसरीकडे इराणने अमेरिकेला असं देखील म्हटलं आहे की, अमेरिकेनं आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करू नये, कारण आमची देखील पूर्ण तयारी आहे, अमेरिकेला जशास तसं उत्तर दिलं जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *