Headlines

मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ


राज्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून महाविकास आघाडीतील पक्षांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी आधीच पक्षाला रामराम ठोकला ज्याचा संपूर्ण महाविकास आघाडीवर मोठा परिणाम झाल्याचं सागितलं जात आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबाबतही मोठे दावे केले जात आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या पक्षातील 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केले.

ठाकरेंच्या पक्षासारखीच परिस्थिती शरद पवार यांच्या पक्षातही निर्माण होऊ शकते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. मात्र हे खासदार पक्ष सोडतील की नाही, याबाबत निश्चित माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हा दावा केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दाव्याबाबत शरद पवार गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *