Headlines

मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा उधळला डाव

मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा उधळला डाव
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा उधळला डाव

पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई थेट पोलीस आयुक्तालय परिसरात झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

तोटेवार यांची नुकतीच मुंबई रेल्वे पोलिसांत बदली झाली होती आणि त्या पदमुक्तही झाल्या होत्या. तरीही त्यांनी एवढी मोठी रक्कम स्वीकारली. एका प्रकरणाच्या तपासादरम्यान एकूण 30 लाखांची मागणी झाल्याचेही समोर आले आहे. त्यातील काही रक्कम आधी घेतल्यानंतर उर्वरित पैसे स्वीकारताना लाचलूचपत विभागाने नीट सापळा रचून कारवाई करवाई केली.

या प्रकरणात संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचेचा नेमका उद्देश काय होता याचा तपास सुरू आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *