Headlines

मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद

मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद


राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे मार्गावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आता त्याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेलाही बसला आहे. रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, महामार्गावर पाणी साचणे आणि वाहतुकीची धोकादायक परिस्थिती लक्षात घेता मुंबई–पुणे एसटी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

या निर्णयामुळे मुंबई आणि पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. सकाळी पुण्याहून मुंबईकडे रवाना झालेल्या चार एसटी बस उरसे टोलनाका परिसरात पाणी साचल्याने आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने अडकून पडल्या होत्या.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत एसटी प्रशासनाने या चारही बस सुरक्षितरित्या पुन्हा पुण्याकडे परत आणल्या. सध्या हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई–पुणे मार्गावरील एसटी सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, पुढील आदेशानंतरच ती पूर्ववत करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी एसटी आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांची माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *