Headlines

मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?

मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?


मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. जरांगे पाटलांनी म्हटले होते की, सरकारने शब्द दिला होता ती सर्व गुन्हे मागे घेतले जातील. जो पर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही. गुन्हे मागे घेतले नाही तर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू. तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपाला विलंब होत आहे, यावरूनही जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उदय सामंत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अंतरवाली सराटीमध्ये भेट

मनोज जरांगे पाटील आणि मंत्री मनोज जरांगे पाटील या दोघांमध्ये आज कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि मराठा आरक्षण उपसमितीवर चर्चा झाली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये ही चर्चा झाली. जरांगे पाटलांनी मागण्या मान्य झाल्या नाही तर जून महिन्यात आंदोलनाचा इशारा दिला होती. यावरही आज उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले सामंत?

मनोज जरांगे पाटील यांना भेटल्यानंतर सामंत यांनी म्हटले की, ‘आंदोलन होऊ नये यासाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील ते सरकार म्हणून आम्ही घेऊ. आडमुठेपणाच धोरण जे अधिकारी घेत असतील त्यांना आम्ही समज देऊ. ज्या काही नियमातल्या गोष्टी आहे, त्यानुसार जरागे यांच्या माध्यमातून झालेल्या मागण्या आणि सरकारनेही त्या मान्य केल्या आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी हीच आमची इच्छा आहे आणि त्यावरच ही सगळी चर्चा झाली आहे.’

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीवर नाराजी व्यक्त केली होती. ‘जी उपसमिती स्थापन झाली आहे त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, त्यांनी दिखावा करण्यासाठी थातुर मातूर बैठका घेऊ नयेत. मराठे मराठ्यांच्या अंगावर घालण्यासाठी उप समिती नाही. त्याचा अध्यक्ष त्यासाठी नाही, तुमचा माज जिरवण्यासाठी उपसमिती नाही’ असं जरांगे पाटलांनी म्हटले होते. यावर बोलताना सामंत म्हणाले की, ‘त्यावर सुद्धा आमची चर्चा झालेली आहे, त्यांनी ज्या ज्या अपेक्षा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विखे पाटील यांच्याकडून व्यक्त केल्या आहेत, त्यावर सविस्तर चर्चा झाली आहे.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *