Headlines

मोठी बातमी! भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट? महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग

मोठी बातमी! भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट? महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग
मोठी बातमी! भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट? महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग


सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाल्याचं पहायला मिळालं. मात्र या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून राज्यसभेवर वर्णी लागली. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला. सुनेत्रा पवार या विधान सभेच्या सदस्य झाल्यामुळे त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची ही जागा रिक्त झाली आहे.

दरम्यान आता भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे.  सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्याची नाही तर भाजप नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून यासंदर्भात माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या जागेवर आता भाजप नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजप नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, सुत्रांकडून या संदर्भातील माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती.  त्यानंतर आज देखील राणा दाम्पत्य पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेली राज्यसभेची जागा कोणाला मिळणार? राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याची वर्णी राज्यसभेवर लागणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीच्या वाट्याच्या राज्यसभेच्या जागेवर आता भाजप नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागण्याची शक्यात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *