Headlines

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय; सर्वात मोठी माहिती समोर!

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय; सर्वात मोठी माहिती समोर!
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय; सर्वात मोठी माहिती समोर!


राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या बैठकीत विलिनीकरणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पक्षाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, “दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही.” त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचं मानलं जात आहे.
विशेष म्हणजे, ही भूमिका मांडली जात असताना शरद पवार उपस्थित होते. त्यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या उपस्थितीत ही भूमिका जाहीर झाल्याने तेही या निर्णयाशी सहमत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत, “आता पक्ष संघटना अधिक मजबूत करून सक्षम विरोधी पक्ष उभा करायचा आहे. विलिनीकरणाचा विषय संपला आहे,” असं स्पष्ट केलं.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *