Headlines

मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


अलीकडेच पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, इतकेच नाही तर या पाठोपाठ आणखी दोन राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी थेट वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

खासदार सुनील तटकरे यांच्या पदावरून राष्ट्रवादीत संभ्रम असल्याचं चित्र असतानाच एक मोठी घडामोड घडली आहे. सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर सुनील तटकरे यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता खासदार सुनील तटकरे यांनीही वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडी, तसेच कार्यकारणींच्या यादीतील नाराजीनाट्य पुढे कोणतं वळण घेईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *