Headlines

मोदी असताना तुम्हाला पंतप्रधान व्हायची का घाई ?- संजय राऊत यांची शाह यांच्यावर टीका

मोदी असताना तुम्हाला पंतप्रधान व्हायची का घाई ?- संजय राऊत यांची शाह यांच्यावर टीका
मोदी असताना तुम्हाला पंतप्रधान व्हायची का घाई ?- संजय राऊत यांची शाह यांच्यावर टीका


आपचे राज्यसभेचे खासदार पळवल्याने सुरु झालेले देशातील भाजपाचे पक्ष फोडण्याचे कारस्थान अखेर पुन्हा महाराष्ट्रात येऊन थांबले आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेची चार वर्षांपूर्वी उभी शकले केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचे ९ पैकी ६ खासदार फोडण्याचे ऑपरेशन टायगर घडले आहे. या ६ खासदारांनी अजून आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यावर सस्पेन्स कायम असताना आता शिवसेना नेते संजय राऊत यांची आज टीव्ही ९ मराठीने मुलाखत घेतली. या मुलाखती काय म्हणाले संजय राऊत वाचा…

भाजपाने देशात अनेक पक्ष फोडायला सुरुवात केली आहे, ते जी ही टीम प्रचंड पैसा ओतून ईडी आणि सीबीआयच्या भीती दाखवत तयार करत आहेत, ती अमित शाह यांची टीम आहे, पंतप्रधान मोदी असताना त्यांना पंतप्रधान व्हायची इतकी घाई का लागली आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपाने टीएमसीच्या २० खासदारांना फोडले. त्यांना कोणत्या त्या आंतरराष्ट्रीय पक्षात काय नाव त्याचे नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडियात विलीन केली आहे. आमच्या खासदारांचा वेगळा गट करण्याच्या तयारीत आहे. या सर्व खासदारांना अजूनही मातोश्रीचे दरवाजे खुले असे कसे ? असा सवाल करताच संजय राऊत म्हणाले की हे खासदार तांत्रिकदृष्ट्या आमच्या शिवसेनेचे सदस्य आहेत. त्याच्या पैकी कुणाला वाटले असेल की आम्ही भरकटलो किंवा चुकलो तर त्यांच्यासाठी दरवाजे खुले ठेवायला काहीच हरकत नाही असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

आम्ही कोणत्या खासदारांचे नाव घेऊन टीका केलेली नाही. पक्षाचा व्हीप असताना बैठकीला आला नाही. आपण दिल्लीत आहात. आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत मिटींग घेतायात अशा पक्ष विरोधी कारवाया सुरु असल्याने शेवटी आम्ही व्हीप जारी केल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

निधी कशाला स्वत:चा विकास करायला हवा का ?

संजय राऊत पुढे म्हणाले की  आज हिंगोलीच्या नागेश पाटील आष्टीकरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ते म्हणतायत विकासासाठी निधी मिळत नाही. परंतू जेव्हा तुम्हाला आमच्या पक्षाने तिकीट दिले तेव्हा तुम्हाला कळले नव्हते का आता सरकार आम्हाला निधी देणार नाही. तु्म्हाला सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराविरोधात पक्षाने आणि उद्धव साहेबांनी निवडून आणले, आता म्हणताय निधी हवा, निधी कशाला स्वत:चा विकास करायला हवा का असाही सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *