Headlines

मोहरमच्या मिरवणूकीत घातपाताचा कट, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने प्लान उद्ध्वस्त….

मोहरमच्या मिरवणूकीत घातपाताचा कट, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने प्लान उद्ध्वस्त….
मोहरमच्या मिरवणूकीत घातपाताचा कट, मुंबई पोलिसांच्या सतर्कतेने प्लान उद्ध्वस्त….


मुंबईतील भायखळा भागात काल ( शुक्रवारी ) एक व्यक्तीला मोहरमच्या मिरवणूकीत गोळ्या वाटताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या व्यक्तीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या आरोपीने पेन किलरच्या नावाखाली विषारी घटक असलेल्या गोळ्या वाटून घातपात करण्याचा कट आखल्याचे उघडकीस आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी सुरु असून या प्रकरणाचा सर्व अँगलने तपास सुरु आहे. या संशयित व्यक्तीकडून १४,९०० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या भायखळ परिसरातून मोहरमच्या मिरवणूकीत एक व्यक्तीला लोकांना टॅबलेट वाटताना पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतले होते. या टॅबलेट वाटण्याची या व्यक्तीने परवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी या त्याला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. या भागात एका व्यक्तीची या टॅबलेट खाल्ल्याने तब्येत ढासळल्याचा रिपोर्ट देखील आला.त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या फैयाज प्रेमजी याची कसून चौकशी केली तेव्हा पोलिसांना धक्कादायक माहिती कळाल्याचे पोलिस उपायुक्त जयंत मीणा यांनी सांगितले.

गोळ्यांमध्ये विषारी घटक

फैयाज प्रेमजी याच्याकडे ज्या गोळ्या सापडल्या आहेत. त्याच्यात एक ग्रॅम झिंक फॉस्फेट सापडले आहे. हा विषारी घटक आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गोळ्या वाटप होण्याआधीच पोलिसांनी त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळल्याचे पोलिस उपायुक्त जयंत मीणा यांनी सांगितले. फैयाज प्रेमजी हा ३९ वर्षांचा असून तो पुणे विमाननगर येथील रहिवासी आहे. त्याचे आधारकार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे. त्याने चौकशी मोहरम मिरवणूकीतील लोकांना टार्गेट करण्यासाठी या विषारी गोळ्या वाटल्याची कबूली दिली आहे.

लोकांना टार्गेट करण्यासाठी गोळ्या

फैयाज प्रेमजी याच्याकडे ज्या गोळ्या सापडल्या आहेत. त्याच्यात एक ग्रॅम झिंक फॉस्फेट सापडले आहे. हा विषारी घटक आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गोळ्या वाटप होण्याआधीच पोलिसांनी त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळल्याचे पोलिस उपायुक्त जयंत मीणा यांनी सांगितले. फैयाज प्रेमजी हा ३९ वर्षांचा असून तो पुणे विमाननगर येथील रहिवासी आहे. त्याने बीबीए केले आहे. त्याचे आधारकार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे. त्याने चौकशी मोहरम मिरवणूकीतील लोकांना टार्गेट करण्यासाठी या विषारी गोळ्या वाटल्याची कबूली दिली आहे.भायखळा पोलीस ठाण्यात BNS कलम 123 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *