Headlines

वयाच्या 10 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 14 मध्ये केलं लग्न, 450 चित्रपटांमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण?

वयाच्या 10 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 14 मध्ये केलं लग्न, 450 चित्रपटांमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण?
वयाच्या 10 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 14 मध्ये केलं लग्न, 450 चित्रपटांमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण?


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या आणि वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिल्क स्मिता यांचा जीवनप्रवास संघर्ष, यश आणि शोकांतिका यांचा संगम होता. गरिबीतून उभारी घेत त्यांनी 1980 ते 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आयुष्यावर आधारित कथा नंतर विद्या बालन अभिनीत द डर्टी पिक्चर या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली.

आंध्र प्रदेशातील एका छोट्याशा गावात वडलापट्टी विजयलक्ष्मी या नावाने त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना तीव्र आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. केवळ 10 व्या वर्षी, चौथीत असतानाच त्यांना शिक्षण सोडावे लागले. 14 व्या वर्षी त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे लग्न एका वयस्कर व्यक्तीशी लावण्यात आले. सासरी त्यांना छळ सहन करावा लागला आणि अखेर दोन वर्षांनी त्यांनी हे लग्न मोडून स्वतःच्या बळावर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर वेगळे झाल्यानंतर त्या आपल्या मावशीच्या मदतीने शहरात आल्या. उदरनिर्वाहासाठी त्यांनी घरकाम तसेच चित्रपटांच्या सेटवर टच-अप आर्टिस्ट म्हणून काम केले. याच काळात त्यांना चित्रपटसृष्टीत प्रवेशाची संधी मिळाली. सुरुवातीला त्यांनी लहान-मोठ्या भूमिका केल्या. दिग्दर्शक विनू चक्रवर्ती यांनी त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन केले. अभिनय, नृत्य आणि वर्तन यांचे प्रशिक्षण घेत त्यांनी करिअरची तयारी सुरू केली.

450 चित्रपटांमध्ये केलं काम

त्यांना पहिली मोठी संधी Inaye Thedi या चित्रपटातून मिळाली. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाल्यामुळे त्यांना सुरुवातीला काही मलयाळम चित्रपटांमध्ये काम करावे लागले. खऱ्या अर्थाने त्यांना लोकप्रियता मिळाली ती 1980 मधील वंदिचक्करम या तमिळ चित्रपटातून. या चित्रपटात त्यांनी ‘सिल्क’ नावाच्या ग्लॅमरस भूमिकेत काम केले आणि याच भूमिकेमुळे त्यांना ‘सिल्क स्मिता’ हे नाव मिळाले.

सिल्क स्मिता यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा विविध भाषांतील चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी रजनीकांत, कमल हासन आणि मोहनलाल यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम केले. 1983 हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीचे शिखर मानले जाते, कारण त्या वर्षी त्या सुमारे 44 चित्रपटांत दिसल्या होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *