Headlines

विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी पुन्हा बोलावलं, मात्र…

विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी पुन्हा बोलावलं, मात्र…
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी पुन्हा बोलावलं, मात्र…


तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला असला, बहुमताच्या आकड्यांमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 118 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. सध्या टीव्हीके पक्षाकडे 108 जागा आहेत. मात्र विजय थलपती हे दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे टीव्हीकेची संख्या 107 वर येणार आहे. विजय थलपती आणि राज्यपाल यांच्या वारंवार भेटीगाठी होताना दिसत आहेत. आलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार राज्यपालांनी विजय थलपती यांना पुन्हा बोलावलं आहे. मात्र बहुमताची अट कायम आहे,

काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दर्शवला असून त्यामुळे पक्षाची एकूण ताकद 112 वर पोहोचली आहे. तरीही बहुमतासाठी अजून सहा आमदारांची आवश्यकता असल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर टीव्हीकेने सरकार स्थापनेचा दावा करत राज्यपालांकडे बहुमताचे पत्र सादर केले आहे. मात्र उपलब्ध आकड्यांवर राज्यपाल समाधानी नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विजय यांच्या शपथविधीला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *