Headlines

सगळं ठरलं, पिस्तुल, कोयता घेऊन…आंदेकर टोळीने पुढचा डाव टाकताच पोलिसांकडून मोठा गेम, 5 जणांना अटक!

सगळं ठरलं, पिस्तुल, कोयता घेऊन…आंदेकर टोळीने पुढचा डाव टाकताच पोलिसांकडून मोठा गेम, 5 जणांना अटक!
सगळं ठरलं, पिस्तुल, कोयता घेऊन…आंदेकर टोळीने पुढचा डाव टाकताच पोलिसांकडून मोठा गेम, 5 जणांना अटक!


Andekar Gang : पुण्यात आंदेकर टोळीची चांगलीच दहशत होती. या टोळीतील अनेकजण आता तुरुंगात आहेत. परंतु तरीदेखील या टोळीत काम करत असलेले अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक या टोळीत कार्यरत असल्याचे बोलले जाते. या टोळीची दहशत आतापर्यंत फक्त पुण्यातच होती असे बोलेले जात होते. परंतु आता मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीत काम करणाऱ्यांची दहशत फक्त पुण्यापुरतीच नव्हे तर अहल्यानगरापर्यंत असल्याचे समोर आले आहे. आंदेकर टोळीचे सदस्य अहिल्यानगरातही कार्यरत आहेत. पोलिसांनी याच टोळीतील पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून पिस्तुल, चाकू, कोयता असे शस्त्र तसेच काही रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. आंदेकर टोळीतील हे पाच जण अहिल्यानगरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील कुविख्यात आंदेकर टोळीतील 5 जणांना आहिल्यानगरातीली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील मिरावली पहाडच्या पायथ्याशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती.

पाच जणांकडून पिस्तुल, कोयता जप्त

अटक करण्यात आलेले पाचही जण दरोड्याच्या तयारीत होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली आणि या पाच जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 4 पिस्तुल, 10 जिवंत काडतूसे, 1 कोयता,1 चाकूसह अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. यासह या पाच जणांकडून 2 लाख 76 हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे काय?

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुश्ताक शेख, विराट मेहंदळे, समर्थ माडळकर,समर्थ दूधभाते, आणि आकाश पवार अशी आहेत. यामध्ये समर्थ माडळकर आणि समर्थ दूधभाते या दोघांवर याआधीच पुणे शहरात खुणाचा प्रयत्न, मकोका, शस्त्र बागळने यासाह अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता त्यांची कसून चौकशी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *