Headlines

सर्वात मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर चर्चा; भेटीचे कारण काय?

सर्वात मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर चर्चा; भेटीचे कारण काय?
सर्वात मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर चर्चा; भेटीचे कारण काय?


Sunil Tatkare Meets Sharad Pawar :  तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रेवादीच्या दोन्ही गटात अनेक घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आले आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले होते. अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायच्या होत्या, असे सांगून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विलीनीकरणाचे समर्थन करत होते. परंतु आता विलीनीकरणाची चर्चा बरीच मागे पडली आहे. दोन्ही पक्ष आपापला विस्तार करण्यासाठी आपापल्या परीने राजकारण करत आहेत. परंतु आता राज्याच्या राजकारणात सर्वांनाच चकित करणारी एक महत्त्वाची घटना घडली आहे. राष्ट्रवादी (दिवंगत नेते अजित पवार यांचा गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे हे खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

प्रफुल्ल पटेल यांचे नाव वगळले?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक यादी दिली आहे. या यादीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. तसेच या यादीतून पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे नाव वगळण्यात आले आहे, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक झाली आहे.

भेटीचे नेमके कारण काय?

सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. परंतु गेल्या काही दिवसांत शरद पवार यांची प्रकृती अनेकदा खालावली आहे. अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ही भेट शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठीच होती, असे सांगितले जात असले तरीही या दोन्ही नेत्यांत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *