Headlines

सूर्य देव कोपला, राज्यात उष्माघाताचे किती बळी? महाराष्ट्रात तापमानाचा नवीन उच्चांक

सूर्य देव कोपला, राज्यात उष्माघाताचे किती बळी? महाराष्ट्रात तापमानाचा नवीन उच्चांक
सूर्य देव कोपला, राज्यात उष्माघाताचे किती बळी? महाराष्ट्रात तापमानाचा नवीन उच्चांक


उष्णाघाताचा बळी?Image Credit source: एजन्सी

Heatstroke in Maharashtra: नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशन हद्दीत तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. सदर परिसरात 58 वर्षीय,यशोधरानगर परिसरात 60 वर्षीय, आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आस्था निवारा येथे वास्तव्यास असलेल्या 65 वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळले. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे तीनही मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण पोस्ट मॉर्टम नंतरच स्पष्ट होणार आहे.

चिमुकलीचा बळी उष्माघाताचा की पाणीटंचाईचा ?

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा गावात एका 6 वर्षीय चिमुकलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या गावात पाण्यासाठी भीषण परिस्थिती असल्याने चिमुकलीला पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करत जावे लागले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यामुळे हा उष्माघाताचा बळी की पाणी टंचाईचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा हे गाव 56 कुटुंबाचे 350 लोकसंख्या असलेले आहे. फासेपारधी समाजाचे गाव आहे. या गावातील प्रत्येक घरासमोर नळचे कनेक्शन आहे. मात्र या नळाला पाणी येत नाही. 8 दिवस आड पाणी पुरवठा केला जात असल्याने इतर दिवस गावकऱ्यांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. याच गावातील अनवी अनाडी भोसले ही चिमुकली दुपारच्या सुमारास आपल्या घरून डोक्यावर कळशी घेऊन पाण्यासाठी गेली. मात्र परत आलीच नाही रस्त्यावर चक्कर पडून तिचा मृत्यू झाला.

अनवी हिला कुठलाही आजार न्हवता शिवाय तिला मळमळ उलटी झाली नाही त्यामुळे तिचा नेमका मृत्यू कसा झाला याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. अनवी हिचे शवविच्छेदन न झाल्याने तिचा मृत्यू कसा याचा शोध कसा लावावा असा प्रश्न सुद्धा आरोग्य यंत्रणेपुढे आहे . गावातील हे दिलेले नळ पाण्याच्या टाकी पासून अगदी काही अंतरावर आहे मात्र या नळातून हवे शिवाय काही येत नाही शोभेच्या वस्तू हे नळाचे कनेक्शन झाले आहे. 8 दिवस आड पाणी पुरवठा या नळातून होतो त्यामुळे रोजच्या जगण्याचा प्रश्न असलेल्या या पारधी समाजाला पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावी लागत आहे

एका चिमुकलीच्या मृत्यूनंतर तालुक्यातील प्रशासन खलबळून जागे झाले खरे मात्र आधीच पाणी पुरवठा सुरळीत झाला असता तर एका चिमुकली चा जीव वाचला असता चिमुकलीचा जीव गेल्या नंतर आता वराती मागून घोडे अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

मजूराचा मृत्यू उष्माघाताने?

लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील भुसनी गावात उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केल्या जात आहे. लक्ष्मण कांबळे ( वय -55) असं मृत्यूमुखी पडलेल्या मजूराचे नाव आहे. कामावरून घरी परत असताना चक्कर येऊन कोसळल्या नंतर त्यांचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *