Headlines

स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न पाहून बसेल धक्का; कोट्यवधींची…

स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न पाहून बसेल धक्का; कोट्यवधींची…
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न पाहून बसेल धक्का; कोट्यवधींची…


देशभरात गाजत असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना अटक केली आहे. सीबीआयने रविवारी, 17 मे 2024 रोजी सायंकाळी पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले.

तासंतासाच्या चौकशीनंतर मोटेगावकर यांच्या पेपरफुटीसंबंधातील गूढ समोर आलं. मोटेगावकरांनी परीक्षेच्या दहा दिवसांआधीच प्रश्नपत्रिका मिळवली होती. या प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट समोर येत आहे, ती म्हणजे मोटेगावकरने आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याचं सूत्रांनी कळवलं आहे. अनेकांना डॉक्टर करणाऱ्या क्लासेसचे संस्थापक मोटेगावर हे स्वत:च डॉकटर नव्हते.

स्वतः डॉक्टर नसल्याने मोटेगावकर यांना मेडिकल कॉलेज स्थापन करणं शक्य नव्हतं, म्हणून ते मुलाला एम.बी.बी.एस. करू पाहत होते. मोटेगावकरांचे पाच एकर पेक्षा मोठ्या जागेवर मेडिकल कॉलेज बांधत असल्याचं समोर आलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोटेगावकरांच्या या मॅडिकल कॉलेजच 50 टक्के काम पूर्ण झालेलं दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *