
काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन खासदार शिल्लक राहिले आहेत. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी दौरा सुरु केला आहे. त्यांनी बंडखोर खासदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांची भेट घेतली. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना शिर्डीतील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उल्लेख खाऊसाहेब करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या शहा सेना पंतप्रधान पदाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर अमित शाहांना पाठिंबा दिली. तुझ्या (फडणवीस) नेतृत्वात भाजप लढली तू ९ खासदार निवडून आणले, शहा सेनेचे १३ खासदार आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल बोलणार नाही असं फुटीर खासदार म्हणतातय. काय बोलणार. लोक तुला जोड्याने मारतील. म्हणे उद्धव ठाकरे देव माणूस आहे. तुम्ही साईबाबांच्या मंदिरात बाबांचे आशीर्वाद घ्यायला जाता की नैवैद्याकडे असतं. हा खाऊसाहेब आपल्याकडे नैवेद्य खायला आला होता. त्याचं लक्ष तिकडे होतं.
‘मला या आधी खाऊसाहेबांच्या भानगडी कुणी सांगितल्या नव्हत्या’
पुढे ते म्हणाले, चूक माझी आहे. मला या आधी खाऊसाहेबांच्या भानगडी कुणी सांगितल्या नव्हत्या. या सहाही खासदाराच्या भानगडी कुणी सांगितले नाही. २०१४ रोजी खाऊसाहेब गेले होते. २०२४मध्ये ज्याने आणलं तेही तिकडे गेले. यांचं आधीच ठरलं होतं. खासदार तिकडे गेला, त्याला आणणारा तिकडे गेला असला तरी त्याला निवडून देणारा शिवसैनिक इकडे आहे. साधे शिवसैनिक आहेत. शेतकरी आहेत. त्यांनी पदरमोड करून त्याला निवडून दिलं. तो होता कुठे?
राज्यात आणि देशात नेभळट कारभार सुरू आहे. फोडाफोडी सुरू आहे. नीटचा पेपर फुटला. तुमचीही मुलं नीटला असतील. त्यांच्या अपेक्षाचं काय? शेतकऱ्याकडे बैल नाही. पण हे नालायक, नीच लोकं खासदार फोडायला लागले आहेत. बातमी आल्यावर बैल दिला. बैल कशाला दिला. एखादा खासदार द्यायचा. मंत्री द्यायचा ना. माजलेले आहेत ते. बैल दिला तोही नांगराच्या भाराने बसला. बैलाला नांगराचा भार पेलवत नाही. पण शाहा सेनेलाला पैशाचा भार पेलवत नाही. कालपर्यंत टीईटीचा पेपर फुटला. तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाही? हा प्रश्न विचारायला आलो आहे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.