Headlines

350 रेप सीन करणारा खलनायक; लग्न ठरताच नातेवाईकांचा धक्कादायक सल्ला

350 रेप सीन करणारा खलनायक; लग्न ठरताच नातेवाईकांचा धक्कादायक सल्ला
350 रेप सीन करणारा खलनायक; लग्न ठरताच नातेवाईकांचा धक्कादायक सल्ला


Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये खलनायक म्हटले की काही ठराविक चेहरे लगेच डोळ्यांसमोर येतात आणि त्यात सर्वात वरचे नाव म्हणजे अभिनेता रंजीत. पडद्यावर त्याच्या डोळ्यांतील क्रूरता, चेहऱ्यावरची शातिर स्मितरेषा आणि अंगावर काटा आणणारी शैली यामुळे तो एकेकाळी प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करणारा खलनायक ठरला होता. इतकेच नाही तर अनेकांनी त्याला खऱ्या आयुष्यातही वाईट माणूस समजायला सुरुवात केली होती.

रंजीतने आपल्या अभिनयाने खलनायकीची एक वेगळीच उंची गाठली. विशेषत महिलांमध्ये त्याच्याबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हीच गोष्ट तो आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मानतो. पडद्यावर महिलांसाठी धोकादायक ठरणारा हा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत शांत आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा आहे. आजही तो सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्याच्या खास ‘अरबी लुक’मुळे लक्ष वेधून घेतो.

फिल्मी प्रवासाची सुरुवात

गोपाल बेदी उर्फ रंजीतचा बॉलिवूडमध्ये प्रवेशही एखाद्या चित्रपटासारखाच नाट्यमय होता. सुरुवातीला एका ब्रिटिश नागरिकाच्या मदतीने त्याला संधी मिळाली. जरी त्याचा पहिला चित्रपट पूर्ण झाली नाही तरी त्यातून त्याची ओळख सुनील दत्त यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांनी रेशमा आणि शेरामध्ये काम केले आणि त्याच्या करिअरला गती मिळाली.

1971 साली आलेल्या शर्मीली या चित्रपटाने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. या चित्रपटातील त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि तो कायमचा खलनायकाच्या भूमिकांमध्ये दिसू लागला.

कुटुंबानेच घराबाहेर काढले

रंजीतने एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्या पहिल्या नकारात्मक भूमिकेनंतर त्याच्या कुटुंबाने त्याला घराबाहेर काढले. पारंपरिक कुटुंबातून आलेल्या त्याच्या आई-वडिलांना वाटले की तो पडद्यावर जे करतो, तेच प्रत्यक्ष आयुष्यातही करतो. विशेषत शर्मीलीमधील एका वादग्रस्त दृश्यामुळे त्याचे कुटुंब खूप नाराज झाले होते.

त्याच्या नकारात्मक प्रतिमेचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. त्याने सांगितले की, जेव्हा तो आपल्या मुलीला भेटायला बाहेर जायचा, तेव्हा लोक त्याच्याकडे संशयाने पाहायचे. त्यामुळे त्याला सार्वजनिक ठिकाणी स्पष्टपणे सांगावे लागायचे की ती त्याची मुलगी आहे.

‘रेपिस्ट विलेन’ म्हणून ओळख

रंजीतने आपल्या कारकिर्दीत सुमारे 500 चित्रपटांमध्ये काम केले असून त्यात 300 हून अधिक बलात्काराच्या दृश्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याला ‘रेपिस्ट विलेन’ अशी ओळख मिळाली. मात्र, त्या काळातील चित्रपटांमध्ये असे दृश्य सादर करताना अश्लीलता टाळली जात असे असं तो सांगतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *