Headlines

4 तास माथापच्ची… विरोध आणि आक्षेप… शेवटी निर्णय झालाच… पुण्यातून राष्ट्रवादीचे काकडेच

4 तास माथापच्ची… विरोध आणि आक्षेप… शेवटी निर्णय झालाच… पुण्यातून राष्ट्रवादीचे काकडेच
4 तास माथापच्ची… विरोध आणि आक्षेप… शेवटी निर्णय झालाच… पुण्यातून राष्ट्रवादीचे काकडेच


काकडे हेच राष्ट्रवादीचे पुण्यातील उमेदवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेल्या विधान परिषदेच्या दोन जागा आल्या आहेत. कोकण आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे. कोकणमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे असणार आहेत. तर पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीत अजून माथापच्ची सुरू होती. सकाळी 9 वाजल्यापासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. दुपार झाली तरी नाव फायनल होत नव्हते. अखेर चार तासाच्या माथापच्चीनंतर विक्रम काकडे यांचे नाव फायनल झाले आहे. काकडे हेच राष्ट्रवादीचे पुण्यातील उमेदवार असणार आहेत.

पुण्यातील जिजाई बंगल्यावरती सकाळी नऊ पासून राष्ट्रवादीची बैठक सुरू होती. पुणे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार राष्ट्रवादी पदाधिकारी यांची सुनेत्रा पवारांसोबत बैठक सुरू होती. विक्रम काकडे यांना तिकीट देण्यास सर्वांचा विरोध होता. अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र, या सर्वांची मनधरणी करण्यात सुनेत्रा पवार यांना यश आलं आहे. सुनेत्रा पवार यांनी अखेर काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. काकडे यांनीही राष्ट्रवादीत तात्काळ प्रवेश घेतला आहे. विक्रम काकडे यांच्या संजय काकडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीतील एका जागेचा तिढा सुटला आहे. तिकीट मिळताच काकडे यांनी मी अर्ज भरायला निघाल्याची प्रतिक्रिया देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

जळगावात दोन अर्ज

दुसरीकडे जळगावातूनही मोठी बातमी येत आहे. जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषद निवडणुकीत दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर झाले असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. शरद तायडे यांच्याकडूनही आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे युवा जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांना देखील पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. मला मिळालेला एबी फॉर्म कोरा असून दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर दुसरा कामात यावा ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून एबी फॉर्म दिल्याची निलेश चौधरी यांची माहिती आहे. उमेदवाराचा अर्ज बाद होऊन निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी पक्षाकडून दोन फॉर्म दिल्याचे देखील निलेश चौधरी यांनी म्हटलंय.

शिंदे गटात नाराजी

तर, जळगाव विधान परिषदेची जागा भाजपला सुटल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अर्ज दाखल करण्यासाठी भाजप कार्यालयात शिवसेना शिंदे गटाचे कुणीही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित नसल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजप कार्यालयात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र, मात्र शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी अनुपस्थित होते. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे उपस्थितीत भाजपकडून शक्तिप्रदर्शन करत दाखल अर्ज दाखल केला जाणार आहे. महायुतीमध्ये भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाली असून मंत्री तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला जाणार आहे. आपल्या पक्षाला जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *