Headlines

7, 8, 9, 10, 11 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, 13 राज्य संकटात, मोठा धोका, वादळी वाऱ्यासह..

7, 8, 9, 10, 11 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, 13 राज्य संकटात, मोठा धोका, वादळी वाऱ्यासह..
7, 8, 9, 10, 11 जूनपर्यंत मुसळधार पाऊस, 13 राज्य संकटात, मोठा धोका, वादळी वाऱ्यासह..


राज्यासह देशात हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला असला तरीही अजून राज्यात पोहोचला नाही. मात्र, त्यापूर्वीच अनेक राज्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह होतोय. चक्रीवादळासह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही तास अनेक राज्यांकरिता धोक्याची आहेत.  भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये मोठा इशारा देण्यात आला.मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

ईशान्येकडील राज्यात पाऊस काही दिवस असेल. 5 जून ते 11 जून दरम्यान मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड याठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 आणि 7 जून रोजी आसाम आणि मेघालयमध्ये, 6 ते 8 जून दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि ताशी 50 किलोमीटर वेगाचे सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही पुढील काही दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाट बघितली जात आहे. फक्त महाराष्ट्रच नाही गोवा, गुजरातमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्याच्या अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. गुजरातमध्येही जोरदार वारे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असेल. यंदा देशात पावसाचा मोठा अंदाज आहे. दोन दिवस उशिरा केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला. यानंतर हळूहळू मॉन्सून पुढे सरकेल. शेतकऱ्यांच्या नजरा मॉन्सूनच्या पावसावर आहे. अवकाळी पाऊस देशातून जाण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *