Headlines

71 वर्षांपासून जगभर गाजणारा भारतीय चित्रपट; 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह देशाची मान उंचावणारी ‘नंबर 1’ कथा

71 वर्षांपासून जगभर गाजणारा भारतीय चित्रपट; 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह देशाची मान उंचावणारी ‘नंबर 1’ कथा
71 वर्षांपासून जगभर गाजणारा भारतीय चित्रपट; 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह देशाची मान उंचावणारी ‘नंबर 1’ कथा


भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. मात्र, एकेकाळी असा समज होता की भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसं स्थान मिळत नाही. पण काही दिग्गज निर्मात्यांनी आपल्या कलाकृतींमधून ही धारणा पूर्णपणे बदलून टाकली. अशाच एका चित्रपटाबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तो म्हणजे पथेर पांचाली.

1955 साली प्रदर्शित झालेला पथेर पांचाली हा भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वाचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन महान दिग्दर्शक सत्यजित राय यांनी केले होते. विशेष म्हणजे, हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. मर्यादित बजेट, साधी कथा आणि ग्रामीण पार्श्वभूमी असूनही या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली कामगिरी

त्या काळात चित्रपट निर्मिती ही खूपच कठीण प्रक्रिया होती. आर्थिक अडचणींमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागली. अनेकदा शूटिंग थांबवावी लागली, पण संपूर्ण टीमने चिकाटी सोडली नाही. ग्रामीण भागात केलेल्या चित्रीकरणामुळे चित्रपटाला वास्तववादी स्पर्श मिळाला.

पथेर पांचाली ने केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी छाप पाडली. या चित्रपटाने जवळपास 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आणि भारतीय सिनेमा जागतिक नकाशावर ठळकपणे दिसू लागला. समीक्षकांनी या चित्रपटाच्या कथानकाची, भावनांची आणि वास्तववादी मांडणीचे प्रचंड कौतुक केले.

आजही का मानला जातो नंबर-1 चित्रपट?

एक सर्वेक्षणानुसार पथेर पांचालीला भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वोत्तम चित्रपट म्हणून मानांकन मिळाले आहे. 71 वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. आजच्या पिढीलाही हा चित्रपट तितकाच भावतो, जितका तो त्या काळातील प्रेक्षकांना भावला होता.

‘पथेर पांचाली’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो भारतीय सिनेमा कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे. साधी कथा, प्रामाणिक भावना आणि वास्तववादी मांडणी यामुळे हा चित्रपट आजही तितकाच प्रभावी वाटतो. सत्यजित राय यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला हा चित्रपट पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *