Headlines

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा झटका, अमेरिकेच्या निर्णयानं देशात भूकंप, आता फक्त एक सही अन्…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा झटका, अमेरिकेच्या निर्णयानं देशात भूकंप, आता फक्त एक सही अन्…
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा झटका, अमेरिकेच्या निर्णयानं देशात भूकंप, आता फक्त एक सही अन्…


अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलमुळे दोन्ही देशांना देखील फायदा होणार आहे. दरम्यान अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील अंतिम टप्प्यात असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली होती, अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ 50 टक्क्यांवरून कमी करून थेट 18 टक्क्यांवर आणला. अमेरिकेनं आशिया खंडातील ज्या सर्व देशांवर टॅरिफ लावला आहे, त्यांच्या तुलनेत भारतावर सध्या सर्वात कमी टॅरिफ आहे. दरम्यान एकीकडे अमेरिकेनं टॅरिफ कमी करून भारताला दिलासा दिला आहे, मात्र दुसरीकडे धाकधूक देखील वाढवली आहे. अमेरिकेमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.

सुरुवातीपासूनच H-1B व्हिसा प्रोगाम डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर राहिला आहे, काही दिवसांपूर्वीच त्यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कामध्ये प्रचंड वाढ केली होती, त्यानंतर आता अमेरिका एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. आता पुढील काही दिवसांमध्ये H-1B व्हिसा प्रोगाम योजना पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. ही योजना कायमस्वरुपी बंद करण्याच्या हालचालीला अमेरिकेत सुरुवात झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसणार आहे. कारण जगभरातून जेवढे लोक अमेरिकेत जॉबसाठी जातात, त्यामध्ये सुमारे 70 टक्के संख्या ही भारताची आहे. अशा परिस्थितीमध्ये जर अमेरिकेनं H-1B व्हिसा प्रोगाम बंद केला तर अनेक भारतीय लोकांचं अमेरिकेत जॉब करण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे.

अमेरिकेच्या संसदेमध्ये H-1B व्हिसा प्रोगाम रद्द करण्यासाठी विधेयक सादर करण्यात आलं आहे. फ्लोरिडाचे रिपब्लिकन पक्षाचे खासदार ग्रेड स्ट्यूब यांनी हे विधेयक सादर केलं आहे. ज्यापद्धतीने सध्या अमेरिकेत H-1B व्हिसा संदर्भात हालचाली सुरू आहेत, ते पहाता लवकरच हे बिल संसदेमध्ये मंजूर होऊन त्याच कायद्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *