Headlines

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प अडकले, रशियाकडून अमेरिकेचा सर्वात मोठा गेम, आतापर्यंत आपल्या शत्रूचा असा बदला कोणीच घेतला नाही

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प अडकले, रशियाकडून अमेरिकेचा सर्वात मोठा गेम, आतापर्यंत आपल्या शत्रूचा असा बदला कोणीच घेतला नाही
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प अडकले, रशियाकडून अमेरिकेचा सर्वात मोठा गेम, आतापर्यंत आपल्या शत्रूचा असा बदला कोणीच घेतला नाही


रशियाकडून अमेरिकेचा मोठा गेम Image Credit source: टीव्ही 9 मराठी

स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये इराण आणि अमेरिकेमधील तणाव प्रचंड वाढला आहे. जोपर्यंत पूर्णपणे युद्धविराम होणार नाही, तोपर्यंत आम्ही स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून माघार घेणार नाही असं अमेरिकेकडून जाहीर करण्यात आलं तर दुसरीकडे अमेरिकेनं आज इराणचं एक व्यापारी जाहाज देखील आपल्या ताब्यात घेतलं आहे. यामुळे आता तणाव आणखी वाढला आहे. इराणकडून अमेरिकेला धमकी देण्यात आली आहे, आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ असं इराणने म्हटलं आहे. अमेरिकेनं युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचा आरोप देखील इराणकडून करण्यात आला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला होता. युद्धविराम संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये हालचाली वाढल्या आहेत. जर चर्चेच्या दुसऱ्याही फेरीत तोडगा निघाला नाही तर पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे.

दरम्यान एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झालेला असतानाच आता रशियामधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये झालेली नाकेबंदी ही युद्धामुळेच झाली आहे, असं अनेकांना वाटत आहे. मात्र पडद्यामागं मोठा खेळ झाला आहे. एका रिपोर्टनुसार हे सर्व रशियानं घडून आणलं आहे. डॉलरचं वर्चस्व समाप्त करण्यासाठी व्लादीमीर पुतिन यांनी यापूर्वीच इराणला सोबत घेऊन मास्टर प्लॅन बनवला होता, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प अडकले आहेत. इराणने आता उघडपणे कच्च्या तेलाचा व्यवहार डॉलरमध्ये न करता चीनी युआनमध्ये सुरू केला आहे. हा अमेरिकन डॉलरसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार रशिया आणि इराणला अमेरिकेचा मोठा फटका बसला आहे. या दोन देशांचं अमेरिकेमुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळेच 2023 मध्ये रशिया आणि अमेरिकेमध्ये एक सिक्रेट डील झाली होती, ज्यामध्ये असं ठरलं होतं की, दोन्ही देशांमध्ये जे काही आर्थिक व्यवहार होतील त्यासाठी डॉलरचा उपयोग करायचा नाही, हे सर्व व्यवहार रशियाची करन्सी रूबेल किंवा इराणची करन्सी रियालमध्येच करायचा. दरम्यान इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे, इराणकडून जहाजांवर टॅक्स लावला जात आहे, हा टॅक्स चीनचं चलन असलेल्या युआनमध्येच द्यावा लागेल असं इराणने म्हटलं आहे. एवंढच नाही तर सध्या इराण आपले जेवढे तेलाचे व्यवहार करत आहे, ते देखील युआनमध्येच करत आहे. भारतानं देखील इराणकडून तेल खरेदी केल्यानंतर त्याचं पेमेंट युआनमध्येच केलं होतं. याचा आता मोठा फटका हा अमेरिकेला बसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *