रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले….

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले….
रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले….


रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता घबराट उडाली. लोक घरातून बाहेर अंगणात आले. हा धक्का 2.8  रिश्टर स्केलचा होता असे म्हटले जात आहे. मात्र, या भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती कळू शकलेली नाही.

गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 इतकी नोंदवली गेली आहे . हा धक्का रात्री 8:10 वाजताच्या सुमारास जाणवला. भूकंपाचे केंद्र जमीनीपासून १० किमी खोलीवर होते. या धक्क्यामुळे लोक घराबाहेर आले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

कोणतीही हानी नाही

रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 2.8 इतकी नोंदवली गेली आहे. त्यामुळे हा एक सौम्य धक्का होता. यामुळे काही वेळ लोक घराबाहेर पडले. या घटनेनंतर सुदैवाने रत्नागिरीतून कोणतीही वित्तहानी किंवा जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. रत्नागिरी जिल्हा हा दक्षिण भारतात भूकंपाच्या 3 आणि 4  या अत्यंत महत्त्वाच्या झोनमध्ये (Seismic Zone III/IV) येतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *