
Neena Gupta Reacts to Pregnancy Rumours: बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत आल्या आहेत, आता नीना गुप्ता कोणत्या सिनेमामुळे नाही तर, व्हायरल व्हिडीओ आणि त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर नीना गुप्ता यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे वयाच्या 66 व्या वर्षी नीना यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून असा दावा करण्यात येत आहे की, वयाच्या 66 व्या वर्षी नीना गुप्ता आई होणार आहे.. यावर आता खुद्द नीना गुप्ता यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीना गुप्ता यांची चर्चा रंगली आहे. तर विनोदी अंदाजात नीना गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका पोर्टलसोबत संवाद साधत असताना नीना गुप्ता यांनी सर्व अफवा फेटाळल्या आहेत. सोशल मीडियावर ‘बेबी बम्प’बद्दल येत असलेल्या कमेंटबद्दल देखील नीना यांना विचारण्यात आलं. यावर नीना म्हणाल्या, ‘आता फक्त हेच बाकी राहिलेलं होतं… ‘बधाई हो…’ अशी कोणतीच गोष्ट नाही… मी प्रेग्नेंट नाही… खरं तर, मी जी साजी नेसली होती, ती जाड असल्यामुळे मी थोडी जाड वाटत होती…’
देश प्रगती करत आहे… – नीना गुप्ता
नीना गुप्ता यांनी रंगणाऱ्या चर्चा सकारात्मक दृष्टीने घेतल्या आहेत. नीना म्हणाल्या, ‘खरं तर या वयात माझ्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगल्या आहे… आणि हे खरंच मजेशीर आहे… . यावरून असं दिसून येते आहे की, आपण एक राष्ट्र म्हणून विकसित होत आहोत आणि अशा गोष्टींबद्दलचा आपला विचार बदलत आहे.’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.
विजय आणि रश्मिका यांच्या लग्नापासून चर्चा सुरु
नीना गुप्ता यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी तेव्हा जोर धरला जेव्हा, अभिनेत्री रश्मिता मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत नीना पतीसोबत पोहोचल्या. व्हिडिओमध्ये नीना साडीम्ध्ये पापाराझींसाठी पोज देत होत्या. काही सोशल मीडिया नेटकऱ्यांनी व्हिडिओखाली कमेंट करायला सुरुवात केली आणि विचारलं की, बेबी बनम्प दिसतोय का आणि ती गर्भवती आहे का? व्हिडीओ आता देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.