Headlines

ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले….

ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले….
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले….


महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार फुटणार असल्याच्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, त्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला काही खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “शिवसेनेचा एकच गट असून तो खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. खासदार फुटणार असल्याच्या चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत.”

राऊत यांनी पुढे सांगितले की, सर्व खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात आहेत. “काल सर्व खासदारांशी संवाद झाला असून आज सकाळीही त्यांच्याशी चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी काही खासदारांशी स्वतंत्रपणेही संपर्क साधला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, काही खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “अशा कोणत्याही पत्राचा मसुदा समोर आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल.”

दरम्यान, या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *