पुढच्या वेळी थेट डोक्यात थेट गोळी घालू… रॅपर बादशाहला थेट धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ

पुढच्या वेळी थेट डोक्यात थेट गोळी घालू… रॅपर बादशाहला थेट धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ
पुढच्या वेळी थेट डोक्यात थेट गोळी घालू… रॅपर बादशाहला थेट धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ


बॉलिवूडमध्ये खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. सिंगर-रॅपर बादशाह याचे हरियाणवी गाणे टटीरी मुळे वाद निर्माण झाला आहे. या वादात आता लॉरेन्स बिश्नोई गँगने एन्ट्री केली आहे. बिश्नोई गँगने पाणिपत येथील गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी घेत फेसबुकवर एक पोस्ट करत बादशाहला थेट डोक्यात गोळी मारण्याची धमकी दिली आहे. बादशाह त्याच्या गाण्यांमुळे हरियाणाची संस्कृती बिघडवत आहेत यामुळे बिश्नोई गँगने ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

हरियाणातील पाणिपतमध्ये एक गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारताना बिश्नोई गँगने बादशाहविरोधात धमकीची पोस्ट शेअर केली आहे. शनिवारी (14 मार्च) पाणिपतच्या असंध रोडवरील वेस्टर्न युनियन कार्यालयावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी रणदीप मलिक आणि अनिल पंडित (USA) यांनी घेतली आहे. हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित गुन्हेगार असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना गँगने म्हटले की, हा गोळीबार हवाला व्यवसाय करणाऱ्यांसाठी ट्रेलर आहे.

बादशाहला थेट जीवे मारण्याची धमकी

लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल माडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की,’सिंगर बादशाह, तू हरियाणाची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न केला आहेस. 2024 मध्ये तुझ्या क्लबमध्ये तुला ट्रेलर दाखवला होता, पुढच्या वेळी थेट तुझ्या कपाळात गोळी मारू.’

बादशाहचे गाणे वादात

1 मार्च रोजी बादशाहचे टटीरी हे गाणे रिलीज झाले होते. त्यानंतरपासून हे गाणे वादात सापडले. वाद वाढल्यानंतर बादशाह यांनी सार्वजनिकरित्या माफीही मागितली होती. त्याने कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही हा वाद थांबण्याचे नाव घेत नाही.

नेमका आरोप काय?

या प्रकरणात सर्वप्रथम हरियाणा राज्य महिला आयोगाने तक्रार दाखल केली होती. या गाण्याचे बोल आणि व्हिडिओमधील दृश्ये आक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला होता. वाद वाढल्यानंतर हे गाणे अनेक प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले होते. दरम्यान, काही कलाकार बादशाहच्या समर्थनातही पुढे आले आहेत. अनेकांनी अशा गाण्यांद्वारे महिला आणि समाजाला टार्गेट करण्याचा हेतू नसतो असं म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *