
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौरांच्या अधिकृत वाहनावर लावण्यात आलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारने 2017 साली सामान्य सरकारी वाहनांवर लाल आणि निळा दिवा लावण्यास बंदी घातली होती. अशा परिस्थितीत महापौरांच्या गाडीवर लाल आणि निळे दिवे का लावण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. “नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नेमकं काय चाललं आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, या प्रकरणावर महापौर रितू तावडे काय भूमिका घेतात आणि गाडीवरील लाल-निळ्या दिव्यांबाबत काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.