
राहुरी आणि बारामती मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तसेच तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.