Headlines

शत्रूही करणार नाही असे काम अमेरिकेने भारतासोबत केले, थेट दणका, चाबदार बंदरावर…

शत्रूही करणार नाही असे काम अमेरिकेने भारतासोबत केले, थेट दणका, चाबदार बंदरावर…
शत्रूही करणार नाही असे काम अमेरिकेने भारतासोबत केले, थेट दणका, चाबदार बंदरावर…


इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. या युद्धात सर्वात जास्त धक्का आणि नुकसान इराणचे होईल, असे सुरूवातीला वाटत होते. मात्र, आता सर्व डाव उलटा पडला असून थेट अमेरिकाच कोंडीत सापडली आहे. अमेरिकेला या युद्धात धक्का बसला. होर्मुज खाडी काही देशांकरिता इराणकडून बंद करण्यात आली, यामुळे जग संकटात आहे. अमेरिकेने अनेक प्रयत्न करूनही इराण काही मागे हटण्याचे नाव घेत नाही. धमक्यांचाही काहीच असर इराणवर होत नाही. उलट इराण अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता अमेरिकेने काही देशांची मदत मागितली. मात्र, एकही देश पुढे आला नाही. मागे आड पुढे विहिर अशी स्थिती अमेरिकेची झाली. मागे हटणेही शक्य नाही आणि पुढे जाता पण येत नाही. अशातच आता अमेरिकेकडून धक्कादायक निर्णय घेतला, ज्याचा थेट फटका भारताला बसताना दिसत आहे.

चाबहार बंदर भारतासाठी खूप महत्वाचे आहे. कारण पाकिस्तानला सरळ बायपास करुन अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत थेट व्यापाराची संधी उपलब्ध होते. भारताने 2003 साली या प्रोजेक्टचा प्रस्ताव दिला. इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरच्या माध्यमातून क्षेत्रीय कनेक्टिविटी मजबूत व्हावी हा त्यामागे उद्देश होता. भारताने 2024 च्या अर्थसंकल्पात चाबहार बंदराकरिता मोठा निधीही दिली. चाबहार बंदर भारतासाठी महत्वाचे असतानाच आता अमेरिकेने थेट चाबहार बंदराला टार्गेट केले.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून चाबहार बंदरावर मोठा हल्ला करण्यात आला. अमेरिकेच्या लढाऊ विमानांकडून चाबदार बंदरातील सैन्य ठिकाणांना निशाणा बनवण्यात आले. मोठे धमक्यांचे आवाज आले. धमक्यांच्या आवाजांनंतर धुराचे लोटही हवेत दिसत होते. ज्यामुळे चाबहार बंदरावर मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओही याबद्दलची व्हायरल झाली आहेत.

होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने अमेरिका भडकली आहे. कोणत्याही पद्धतीने अमेरिकेला हा मार्ग सुरू करायचा आहे. कारण होर्मुज मार्ग बंद असल्याने कच्च्या तेलाची निर्यात आणि आयात पूर्णपणे थांबली आहे. होर्मुज मार्ग बंद असला तरीही भारताचे जहाज इराणकडून सुरक्षित काढले जात आहेत. यामध्येच आता अमेरिकेने थेट चाबहार बंदराला टार्गेट केले आहे. चाबहार बंदराचा विकास भारताकडून करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *