Headlines

मी फिजिकली सॅटिस्फाइड..; लग्न न करण्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं रोखठोक उत्तर

मी फिजिकली सॅटिस्फाइड..; लग्न न करण्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं रोखठोक उत्तर
मी फिजिकली सॅटिस्फाइड..; लग्न न करण्याच्या प्रश्नावर प्रसिद्ध सेलिब्रिटीचं रोखठोक उत्तर


बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेता सलमान खान आणि कोरिओग्राफर गीता कपूर यांच्या लग्नाविषयी चाहत्यांकडून नेहमीच प्रश्न विचारले जातात. 52 वर्षीय गीता आजही सिंगल आहे. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळवल्यानंतरही गीताला अनेकदा, तू लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारला होता. तिच्याकडे नृत्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या चाहत्यांनी तिला ‘गीता माँ’ असं नाव दिलं आहे. कोरिओग्राफीच्या विश्वात नाव कमावलेल्या गीताने एका मुलाखतीत इंटिमसी आणि शारीरिक संबंधाबाबत मोकळेपणे भाष्य केलं होतं. त्यावरून बराच वादसुद्धा झाला होता. “लग्न न केल्यामुळे मला माझ्या आयुष्यात कोणतीच कमतरता किंवा अपूर्ण असल्यासारखं वाटत नाही. आपल्या समाजात असं मानलं जातं की स्त्री विवाहित नसेल तर तिचं जीवन अपूर्ण आहे, परंतु मी या मताशी सहमत नाही”, असं ती म्हणाली होती.

या मुलाखतीत गीता कपूर पुढे म्हणाली, “लोक अनेकदा कोणतीच माहिती असल्याशिवाय इतरांच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी गृहित धरतात. लोकांना असं वाटतं की जर एखाद्याने लग्न केलं नसेल तर तो एकतर खूप धार्मिक आयुष्य जगत असेल किंवा पूर्णपणे एकटा असेल. मी कुमारी नाही किंवा ननसुद्धा नाही. मी सर्वसामान्य आयुष्य जगतेय. जर तुम्ही फिजिकली सॅटिस्फाइड राहण्याबाबत विचारत असाल तर, त्याला माझं उत्तर असेल हो. तुम्हाला काय वाटतं, मी नसेन का? यात वाईट काय आहे? मी शारीरिकदृष्ट्या समाधानी आहे.”

“स्वत:ला फिजिकली सॅटिस्फाय करणं चुकीचं नाही. हल्लीच्या काळात त्याला वेलनेस असं म्हणतात. याला वुमेन्स वेलनेस असंही म्हणतात. मी नन किंवा कुमारी नाही. मी माझे मोमेंट्स शोधू शकते. लोकांना भेटू शकते आणि एखाद्यासोबत इंटिमेटही होऊ शकते. जर एखादी महिला स्वत:कडे लक्ष देत असेल तर त्यात वाईट काय आहे”, असा थेट सवाल गीता कपूरने मुलाखत घेणाऱ्याला केला होता.

गीता कपूरने वयाच्या 15 व्या वर्षापासून प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या टीमसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. तिने फराहला ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल तो पागल है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मोहब्बतें’ यांसारख्या चित्रपटांच्या कोरिओग्राफीमध्ये मदत केली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *