Headlines

डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, महत्त्वाच्या देशाचा हादरवणारा निर्णय; आता युद्धात…

डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, महत्त्वाच्या देशाचा हादरवणारा निर्णय; आता युद्धात…
डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, महत्त्वाच्या देशाचा हादरवणारा निर्णय; आता युद्धात…


Iran Israel War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता 15 दिवस होऊन गेले आहेत. हे युद्ध सध्यातरी संपण्याची शक्यता नाही. अमेरिकेवरील दबाव वाढवा यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. या मार्गाने जगातील साधारण 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. त्यामुळे जगभरात इंधनटंचाई निर्माण झाली आहे. भारतालाही त्याचा फटका बसत आहे. भारतात गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे होर्मुझच्या खाडीतून तेलवाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जगातील मित्रराष्ट्रांना आवाहन केले जात आहेत. या मार्गातून तेलाची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना व्हावी यासाठी अनेक देशांनी आपले नौदल पाठवावे, असे आवाहन केले आहे. परंतु या आव्हानाला कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. असे अतानाच आणखी एका देशाे ट्रम्प यांना जबर धक्का दिला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच अडचण झाली आहे.

नेमकं काय घडलं? जपानने काय निर्णय घेतला?

जपानने आम्ही जलमार्गाच्या सुरक्षेसाठी कोणतेही सैन्य पाठवण्याचा विचार केलेला नाही, असे थेट सांगितले आहे. जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनीच याबाबत संसदेत सांगितले आहे. “होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहूत करणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी नौसैनिक पाठवण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जपान सध्यातरी स्वतंत्ररित्या काय करू शकतो, कायदेशीर मार्गाने काही तोडगा निघू शकतो का? यावर आमचा विचार चालू आहे,” असे साने ताकाइची यांनी संसदेत सांगितले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमके काय आवाहन केले?

होर्मुझमधून तेल वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांना आवाहन केलेले आहे. होर्मुझमधून तेल कंटेनर, तेलाच्या जहाजाची सुरक्षितरित्या वाहतूक व्हावी यासाठी वेगवेगळ्या देशांनी आपापले सैन्य पाठवावे, असे ट्रम्प म्हणाले होते. यामध्ये चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन या देशांचा समावेश आहे. परंतु अद्याप एकाही देशाने जाहीरपणे ट्रम्प यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही. तसे समर्थनही कोणीच केलेले नाही. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *