
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव चेक बाउंस प्रकरणी अडचणीत आला होता. या काळात चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसह काही मोठ्या व्यावसायिक कंपन्यांनीही त्याला मदतीचा हात दिला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने सर्वांचे आभार मानले होते.
विशेष म्हणजे त्याला अनेक कामांच्या ऑफर्स मिळाल्या पण एका कंपनीने सर्वप्रथम आपले वचन पूर्ण केले. Yes Madam या कंपनीचे CEO मयंक आर्य यांनी राजपाल यादवला त्यांच्या ब्रँडसाठी जाहिरात करण्याची ऑफर दिली होती. आता या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
या जाहिरातीत राजपाल यादव लोकप्रिय ‘छोटा डॉन’ या भूमिकेत दिसत आहे. या कथानकात तो गुंडांच्या तावडीत अडकलेल्या तान्या मित्तलला वाचवताना दिसत आहे. अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेली ही जाहिरात प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः तान्या मित्तलच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. बिग बॉस 19 मधून प्रसिद्ध झालेल्या तान्या मित्तलसाठी हा एक मोठा ब्रेक मानला जात आहे. मोठ्या स्टारसोबत काम करण्याची ही तिची पहिलीच संधी असून प्रेक्षकांनी तिला जबरदस्त डेब्यू असे संबोधले आहे.
राजपाल यादवच्या कठीण काळात मिळालेल्या या संधीने त्याला पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणले आहे. Yes Madam च्या जाहिरातीमुळे त्याचा ‘छोटा डॉन’ अवतार पुन्हा चर्चेत आला असून या अनोख्या जाहिरातीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.