Headlines

मोठी बातमी! नंदुरबारला 3 महिन्यांनंतर मिळाला पालकमंत्री, कोकाटेंनंतर आता या मंत्र्याकडे जबाबदारी

मोठी बातमी! नंदुरबारला 3 महिन्यांनंतर मिळाला पालकमंत्री, कोकाटेंनंतर आता या मंत्र्याकडे जबाबदारी
मोठी बातमी! नंदुरबारला 3 महिन्यांनंतर मिळाला पालकमंत्री, कोकाटेंनंतर आता या मंत्र्याकडे जबाबदारी


गौतम बैसाणे, प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. तीन महिन्यांनंतर नंदुरबार जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी हसीन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडे पुन्हा नंदुरबारचे पालकमंत्रपद देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हसीन मुश्रीफ नवे पालकमंत्री

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे हे आधी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणात दोषी आढळल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांना नंदुरबारचे पालकमंत्रिपदही गमवावे लागले होते. डिसेंबर 2025 पासून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रिक्त होते. मात्र आता ही जबाबदारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसीन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे. सोलापूरनंतर आता नंदुरबार जिल्ह्याचे देखील जबाबदारी मुश्रीफ यांच्याकडे असणार आहे. शासनाकडून परिपत्रक जारी करून पालकमंत्री पदाची माहिती देण्यात आली आहे.

कोण आहेत हसन मुश्रीफ?

हसन मुश्रीफ यांचा जन्म 24 मार्च 1954 रोजी झाला, त्यांनी बी. ए. ऑनर्सचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केला आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुख नेते आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदारकीची डबल हॅट्ट्रिक केलेली आहे. ते महायुती सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनही होते. सन 1985 ते 2009 या काळात ते जिल्हा बँकेचे संचालक होते. ते सर्वप्रथम ऑक्टोबर 1999 मध्ये विधानसभेवर निवडून गेले. त्यावेळी विलासराव देशमुख मंत्रीमंडळात पधुसंवर्धन, दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यांना मोठा राजकीय अनुभव आहे. याचा फायदा आता नंदुरबार जिल्ह्याला होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *