Headlines

NZ vs SA: गोलंदाजांचा कहर आणि टॉमचा अर्धशतकी झंझावात, न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय, दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने धुव्वा

NZ vs SA: गोलंदाजांचा कहर आणि टॉमचा अर्धशतकी झंझावात, न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय, दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने धुव्वा
NZ vs SA: गोलंदाजांचा कहर आणि टॉमचा अर्धशतकी झंझावात, न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय, दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सने धुव्वा


यजमान न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत पराभवाने सुरुवात झाल्यानंतर जोरदार कमबॅक करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. उभयसंघात तिसरा सामना हा ऑकलंडमध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. न्यूझीलंडचे गोलंदाज आणि ओपनर टॉम लॅथम यांनी या विजयात प्रमुख योगदान दिलं. तसेच इतरांनीही आपलं योगदान दिलं.

न्यूझीलंडच्या फलंदाजांसह गोलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी करत सुरुवातीपासूनच सामन्यावर घट्ट पकड मिळवली. न्यूझीलंडने शेवटपर्यंत दबदबा कायम ठेवत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत विजयी सुरुवात करत यजमानांना झटका दिला होता. मात्र न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यातील धमाका तिसऱ्या मॅचमध्येही यशस्वीरित्या कायम ठेवला.

सामन्यात काय झालं?

दक्षिण आफ्रिकेला मोठ्या धावसंख्या करण्यापासून रोखल्याने न्यूझीलंडला 137 धावांचं आव्हान मिळालं. न्यूझीलंडने हे आव्हान 22 बॉलआधी 8 विकेट्स राखून हे आव्हान पूर्ण केलं. न्यूझीलंडने 16.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी ओपनर टॉम लॅथम याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. लँथमने नाबाद 63 धावा केल्या. डेव्हॉन कॉनव्हे आणि टॉम लॅथम या सलामी जोडीने 96 धावांची भागीदारी केली. या जोडीच्या भागीदारीने न्यूझीलंडचा विजय निश्चित झाला.

न्यूझीलंडसाठी टॉम व्यतिरिक्त डेव्हॉन कॉनव्हे याने 39 धावांचं योगदान दिलं. तर टीम रॉबिन्सन याने 17 धावांची खेळी केली. तर लॅथम आणि निक केली ही जोडी न्यूझीलंडला जिंकून नाबाद परतली.

त्याआधी न्यूझीलंड टीमने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या बहुतांश फलंदाजांना ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र एकालाही न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर फार वेळ तग धरता आला नाही. न्यूझीलंडसाठी कायल जेमीसन, मिचेल सँटनर आणि बेन सियर्स या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर लॉकी फर्ग्यूसन, मॅककाँची आणि जेम्स निशाम या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. लॉकीने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 9 धावा देत चिवट बॉलिंग केली. त्यामुळे लॉकीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

चौथा सामना कधी?

दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी 20i सामना हा रविवारी 22 मार्च रोजी होणार आहे. न्यूझीलंडला सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिसेसमोर मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत चौथा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे चौथा सामना हा निर्णायक ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *