Headlines

IPL 2026 स्पर्धेत खेळण्यासाठी लाखो रूपयांवर सोडले पाणी, झालं असं की…

IPL 2026 स्पर्धेत खेळण्यासाठी लाखो रूपयांवर सोडले पाणी, झालं असं की…
IPL 2026 स्पर्धेत खेळण्यासाठी लाखो रूपयांवर सोडले पाणी, झालं असं की…


IPL 2026 स्पर्धेत खेळण्यासाठी लाखो रूपये सोडले, PSL सोडून हा खेळाडू या संघात झाला सहभागीImage Credit source: IPL Twitter

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा ही जगभरात लोकप्रिय आहे. या स्पर्धेत खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होतो. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्याचं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. मागच्या 18 पर्वात अनेक खेळाडूंचं स्वप्न पूर्ण झालं आहे. तसेच त्यांना ओळखही मिळाली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या स्पर्धेत कोट्यवधी रुपये कमवणे हाच एकमेव हेतू नसतो, तर या स्पर्धेतून नावलौकीकही मिळतो. पण एक खेळाडू असाही आहे की त्याने आयपीएल खेळण्यासाठी आपलं लाखो रुपयांचं नुकसान केलं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉनसनने पाकिस्तानी सुपर लीग स्पर्धेतून माघार घेतली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. उंच आणि डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने स्पेन्सर जॉनसनचा विचार चेन्नई सुपर किंग्सने केला.

स्पेन्सर जॉनसन यापूर्वी आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळला आहे. पण आता चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणार आहे. आयपीएल व्यवस्थापनाकडून 24 मार्चला त्याबाबतची घोषणा करण्यात आली. चेन्नई सुपर किंग्सने त्याला नाथन एलिसचा बदली खेळाडू म्हणून संघात घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज एलिसला दुखापत झाली असून या स्पर्धेला मुकला आहे. पण हा करार होत असताना एक आश्चर्यकारक बाब उघडकीस आली आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याचं आर्थिक नुकसान होणार आहे. कारण पाकिस्तान सुपर लीग सोडली असली तर त्याला आयपीएलमध्ये तेवढी रक्कम मिळणार नाही.

आयपीएलकडून जाहीर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये जॉनसनला 1.5 कोटी रुपये चेन्नई सुपर किंग्सकडून मिळणार आहेत. ही त्याची लिलावातील बेस प्राईस होती. तेव्हा त्याला कोणीच विकत घेतलं नाही. त्यानंतर त्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. तेव्हा क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने त्याला थेट साइन करत 5.6 कोटी पीकेआर दिले. भारतीय रुपयाशी तुलना केली तर ही रक्कम 1.87 कोटी होते. पण आता आयपीएलमध्ये त्याला 1.5 कोटी मिळणार आहेत. म्हणजेच 37 लाखांचं नुकसान होणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *