
मोठ्या पडद्यावर दमदार भूमिकांमध्ये झळकणारा अभिनेता संजय दत्त खऱ्या आयुष्यात 'धुरंधर'पेक्षा कमी नाही. संजूबाबा अत्यंत आलिशान आयुष्य जगतो. घर, गाडी, बंगला यांसह त्याच्याकडे ऐशोआरामाची अनेक साधनं आहेत.
संजय दत्त मुंबईतील पाली हिल्स या अत्यंत पॉश परिसरात पत्नी आणि मुलांसोबत राहतो. याठिकाणी त्याचा आलिशान बंगला असून त्याची किंमत जवळपास 50 कोटी रुपये इतकी आहे.
संजय दत्तच्या या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आई नरगिस आणि वडील सुनील दत्त यांच्या आठवणी पहायला मिळतात. घराच्या भिंतींवर त्यांचे अनेक फोटो लावलेले आहेत. संजयचं हे घर अत्यंत सुंदररित्या सजवण्यात आलं आहे.
संजूबाबाच्या घराला रंगीत काचेच्या खिडक्या आणि संगमरवरी फरशी आहे. लिव्हिंग रुममध्ये विविध सोफा सेट लावलेले आहेत, जिथे अनेक लोक आरामात बसू शकतील.
संजयच्या घरात अँटिक लॅम्प, इलेक्ट्रिक गिटार आणि रायफलच्या बाजूला एक फ्लोअर लॅम्प पहायला मिळतंय. घराच्या इंटेरिअरला जुन्यासोबतच मॉडर्न टच दिला आहे.
घराच्या लिव्हिंग रुमला पांढरा रंग देण्यात आला असून फर्निचर आणि कलर थीम विशेष लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावर संजय दत्तने त्याच्या घरातील बरेच फोटो पोस्ट केले आहेत.
खऱ्या आयुष्यात संजय दत्त खूपच धार्मिक असून त्याच्या घरात मोठं आणि सुंदर मंदिर आहे. या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित आहे. त्यासोबत इतर देवदेवतांच्याही मूर्ती आहेत.
संजय दत्त चित्रपटांशिवाय इतर बिझनेसमधूनही तगडी कमाई करतो. त्याच्याकडे 295 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं कळतंय. संजूबाबाला गाड्यांचीही फार आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस, रेंज रोव्हर, ऑडी, फरारी यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.