Headlines

घर सोडून जाणं ते चोऱ्यामाऱ्या… लिंगपिसाट खरात कसा बनला नराधम भोंदू बाबा… अत्यंत जवळच्या व्यक्तिने सर्वच बाहेर काढलं

घर सोडून जाणं ते चोऱ्यामाऱ्या… लिंगपिसाट खरात कसा बनला नराधम भोंदू बाबा… अत्यंत जवळच्या व्यक्तिने सर्वच बाहेर काढलं
घर सोडून जाणं ते चोऱ्यामाऱ्या… लिंगपिसाट खरात कसा बनला नराधम भोंदू बाबा… अत्यंत जवळच्या व्यक्तिने सर्वच बाहेर काढलं


नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात विरोधात अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. त्याच्यावर आतापर्यंत 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशोक खरातचे नवनवीन कारनामे दररोज समोर येत आहेत. अनेक राजकीय नेतेही अशोक खरातच्या संपर्कात होते हेही समोर आले आहे. तसेच खरातने भोंदुगिरी करून कोट्यवधींची संपत्ती जमवली होती अशी माहितीही समोर आली आहे, तसेच त्याने नरबली दिल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे. अशातच आता खरातबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तीने त्याची पोलखोल केली आहे. यात तो भोंदू बाबा कसा बनला हे देखील सांगण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अशोक खरात भोंदू बाबा कसा बनला?

अशोक खरातच्या परिचयातील व्यक्ती राजेंद्र खताळे यांनी सांगितले की, ‘खरातचे कुटुंबाशी वाद झाले होते त्यावेळी तो घर सोडून गेला होता. तो दहावी नापास असून कॅप्टन नाही. त्याची एक एसटीडी देखील होती, तिथून त्याच्या भोंदूगिरीची सुरुवात झाली. तो प्लॉटिंग व्यवसाय करू लागला, त्यानंतर लग्न जुळवू लागला, त्यातून नंतर भविष्य सांगायला लागला. त्याने एकदा गॅस टाकी देखील चोरली होती. एक लग्न जुळवण्याच्या वेळी त्याचे माझे संबंध आले, मात्र मी त्याला नाही म्हणून सांगितले. तो भोंदू असल्याचा मला माहित होतं. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’

खरात भाजपचा प्रचारक होता – राऊत

खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले की, ‘क्रूर कृत्य घडत होती याची माहिती मुख्यमंत्री यांना होती. एका महिलेच्या तक्रारीची तुम्ही वाट पाहत बसलात हे चुकीचं आहे. नाशिक सोडून द्या. नाशिक पोलिसांची ती फॅशन झाली आहे. नाशिक जर कायद्याचा बालेकिल्ला असता तर खरात सारखी प्रकरणं निर्माण झालीच नसती. बीडमध्ये कोण आहे तिथे? हे भाजपचे हस्तक आणि समर्थक आहेत. खरात हा भाजपचा प्रचारक होता. बच्चू कडू यांना आशीर्वाद देतात की भाजपचे मंत्री बनून इथे तुम्ही या. निवडणूक काळात अशोक खरात भक्तांची मदत घेऊन मतदान करा अस सांगत होता. आमच्या विरोधात काहीतरी सुरू आहे अस लोकांना वाटल्याने हे प्रकरण बाहेर आलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *