
तेजस्वी प्रकाश, करण कुंद्राImage Credit source: Instagram
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तेजस्वीने तिच्या लग्नाबद्दल हिंट दिली होती की ती 2026 मध्ये विवाहबंधनात अडकू शकते. परंतु नेमकं कधी हे तिने सांगितलं नव्हतं. आता या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तेजस्वी आणि करणवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. परंतु या दोघांनी खरंच लग्न केलं का, याबद्दल अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही. तेजस्वी आणि करण यांचा एक फोटो व्हायरल होत असून त्यामुळेच त्याच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. ‘बिग बॉस’च्या पंधराव्या सिझनमध्ये हे दोघं स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरातच यांच्यात लव्ह-स्टोरी सुरू झाली होती.
‘जोपर्यंत पर्मनंट होत नाही, तोपर्यंत प्रायव्हेट ठेवा. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांना शुभेच्छा. आयुष्याच्या या नव्या प्रवासाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा’, असं ट्विट एका युजरने केलं आहे. यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं. ‘सर्वांना नेमकं काय झालंय? का शुभेच्छा देत आहेत? या दोघांनी गुपचूप लग्न केलं, हे कसं समजलं’, असा सवाल एका युजरने केला आहे. तर ‘तेजस्वी आणि करण कुंद्राने खरंच लग्न केलं का’, असं काहींनी विचारलं आहे. याबद्दल आता करण किंवा तेजस्वीचं स्पष्टीकरण देऊ शकतात.
Keep it private until it’s permanent 🧿❤️
congratulations @kkundrra @itsmetejasswi, best wishes for unlocking new chapter of your lives 🥰 pic.twitter.com/hEKwsfGkmQ
— 1D_tuk_ a_chonce (@1d_tuk) March 25, 2026
तेजस्वीने कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, बिग बॉस 15 हा शो संपल्यानंतर करणने तिला प्रपोज केलं होतं. परंतु आईमुळे तिने लग्न पुढे ढकललं होतं. करण आणि तेजस्वीने एकमेकांना ओळखण्यासाठी आणखी थोडा वेळ घ्यायला हवा, असा सल्ला आईने दिला होता. यावेळी जेव्हा भारतीने तिला विचारलं की 2026 मध्ये आम्हाला काही आनंदाची बातमी ऐकायला मिळेल का? तेव्हा तेजस्वीने होकारार्थी उत्तर दिलं होतं. करण आणि तेजस्वी गेल्या काही वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचीही चर्चा आहे. करण हा टेलिव्हिजन अभिनेता असून तेजस्वीपेक्षा तो वयाने 9 वर्षांनी मोठा आहे.