Headlines

इराण अमेरिका युद्ध थांबणार, जगासाठी आनंदाची बातमी, थेट, महिने नाहीच आता आठवड्यातच..

इराण अमेरिका युद्ध थांबणार, जगासाठी आनंदाची बातमी, थेट, महिने नाहीच आता आठवड्यातच..
इराण अमेरिका युद्ध थांबणार, जगासाठी आनंदाची बातमी, थेट, महिने नाहीच आता आठवड्यातच..


इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता जगाचा दबाव आहे. प्रत्यक्षात हे युद्ध इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्येच सुरू आहे, ही वस्तूस्थिती असली तरीही या युद्धात जगातील जवळपास सर्वच देश होरपळत आहेत. युद्ध थांबवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यादरम्यानच आता युद्ध कधी थांबणार याबाबत अत्यंत मोठी माहिती अमेरिकेकडून देण्यात आली. युद्ध नक्की कधी थांबणार हे पहिल्यांदाच अमेरिकेकडून सांगण्यात आले. मार्काे रूबियो यांनी इराणसोबतच्या युद्धावर बोलताना म्हटले की, हे ऑपरेशन महिने नाह तर आठवड्यांमध्ये संपू शकते. या युद्धात अमेरिकी सैन्याला जमिनीवर उतरवण्याचीही गरज नाही. फ्रान्स G7 देशांच्या बैठकीत बोलताना रूबियो यांनी म्हटले की, अमेरिका आपले टार्गेट वेळाच्या अगोदर पूर्ण करू शकतो. महिन्यांपूर्वी युद्ध ओढले जाणार नाही तर आठवड्यांमध्ये युद्ध संपेल, असे स्पष्ट शब्दात रूबियो यांनी म्हटले.

रूबियो यांनी केलेल्या या विधानामुळे जगाने मोठा निश्वास घेतला आहे. सतत हे युद्ध थांबण्याची मागणी केली जात आहे. या युद्धामुळे जागतिक संकट उभे आहे. लवकरात लवकर कोणात्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबण्याची मागणी असताना अमेरिकेकडून गोड संकेत देण्यात आले. 6 एप्रिलपर्यंत अमेरिकेकडून युद्ध बंदीची घोषणा करण्यात आली.

पण ही युद्धबंदी इराणला मान्य नाही. इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत. थेट अमेरिकेच्या सैन्याला टार्गेट करून हल्ला करण्यात आला. इराणकडून हे युद्ध थांबवण्याकरिता एकून 6 अटी ठेवण्यात आल्या. जोपर्यंत या अटी मान्य होत नाहीत, तोवर आपण युद्धातून मागे हटणार नसल्याचे इराणकडून सांगण्यात आले.

यासोबतच आपल्याला अमेरिकेवर विश्वास नसल्याचे इराणने सांगितले. या युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई इराणने मागितली आहे. इजिप्त या युद्धात मध्यस्थी करत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. यासोबतच तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांना टार्गेट करत मोठे हल्ले करण्यात आली. परिस्थिती अशी गंभीर असताना युद्ध थांबवण्याकरिता अमेरिकेवर दबाव आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *