Headlines

Saba Azad : हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडला सायक्लोस्पोरा आजार, हा रोग काय आहे? लक्षणं काय? त्यापासून कसा बचाव कराल?

Saba Azad : हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडला सायक्लोस्पोरा आजार, हा रोग काय आहे? लक्षणं काय? त्यापासून कसा बचाव कराल?
Saba Azad : हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडला सायक्लोस्पोरा आजार, हा रोग काय आहे? लक्षणं काय? त्यापासून कसा बचाव कराल?


बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि सिंगर सबा आजाद मागच्या काही दिवसांपासून आजारी आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर हॉस्पिटल बेडवरील फोटो शेअर करुन आजारी असल्याची माहिती दिली. सबाने इन्स्टाग्राम पोस्टवर हैराण करणारा खुलासा केलाय. मागच्या 14 दिवसांपासून ती पोटाच्या रेअर इंफेक्शन सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिसचा सामना करतेय. या इंफेक्शनने तिला शारीरिक दृष्टया खूप कमकुवत केलं. तिचं वजन जवळपास 4 किलो कमी झालं. चालण-फिरण देखील तिच्यासाठी कठिण बनलं.

सबा आजाद आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते. हेल्दी लाइफस्टाइल आणि घरात बनवलेल्या जेवणाला तिचं प्राधान्य असतं. हा आजार तिला झाल्याने ती हैराण आहे. या कठिण काळात हृतिक रोशन तिची हिम्मत वाढवतोय. पण सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिस इंफेक्शन काय असतं, हे तुम्हाला माहित आहे का?. या आजाराची लक्षण काय आहेत?. या इंफेक्शनपासून तुम्ही स्वत:चा कसा बचाव करु शकता.

सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिसची शरीरात एन्ट्री कशी होते?

सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिस एक सूक्ष्म परजीवी आहे. खराब खाणं आणि खराब पाण्यामुळे या जंतूची शरीरात एन्ट्री होते. हे इंफेक्शन आतड्यांना प्रभावित करतं. पचन संस्था खराब होते. स्वच्छता नसलेल्या जागी आणि खाद्य सुरक्षेवर लक्ष दिलं जात नाही अशा ठिकाणी हा आजार प्रामुख्याने होतो.

सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिस इंफेक्शन कसं पसरतं?

दूषित पाणी पिल्यामुळे

कच्चा व व्यवस्थित न धुतलेल्या भाज्या आणि फळ खाण्यामुळे

घाणेरड्या ठिकाणी बनवलेलं जेवण

संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने.

सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिसची लक्षणं

सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिसची लक्षणं लगेच दिसत नाहीत. काही दिवसांनी दिसतात.

जुलाब लागणं

पोटदुखी

उल्टी

थकावट कमजोरी जाणवणं

भूख कमी होणं

वजन कमी होणं

ताप

शरीरात पाण्याची कमतरता

सायक्लोस्पोरा केयेटेनेंसिस इंफेक्शनपासून कसा बचाव कराल

नेहमी स्वच्छ आणि उकळलेलं फिल्टर पाणी प्या.

फळं आणि भाज्या नीट स्वच्छ करुनच खा.

जेवण नीट बनवा.

बाहेरचं खाण खाताना स्वच्छतेकडे लक्ष द्या.

सबा आजाद आता हळूहळू बरी होत आहे. तिने आपल्या अनुभवातून लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करतेय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *