Headlines

IPL 2026 : महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना धक्का, आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही? धाकधूक वाढली

IPL 2026 : महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना धक्का, आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही? धाकधूक वाढली
IPL 2026 : महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना धक्का, आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही? धाकधूक वाढली


महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना धक्का, आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही? धाकधूक वाढलीImage Credit source: CSK TWITTER

आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरूवातीला चेन्नई सुपर किंग्स संघ संकटात आला आहे. कारण सुरूवातीच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं मार्गदर्शन मिळणार नाही. महेंद्रसिंह धोनी पोटरीच्या दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी महेंद्रसिंह धोनी दोन आठवड्यांचा अवधी लागेल असं फ्रेंचायझीकडून सांगण्यात आलं होतं. या दोन आठवड्यांच्या कालावधीत तीन सामन्यांना मुकणार असा अंदाज क्रीडाप्रेमींनी काढला होता. पण आता धोनीच्या दुखापतीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहमार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, धोनीला बरं होण्यासाठी एक दोन नव्हे तर तीन आठवडे लागू शकतात. म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संघाच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. म्हणजे साखळी फेरीतील 6 सामन्यात नसेल असं बोललं जात आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ तेथे पोहोचला आहे. पण धोनी अजूनही चेन्नईत उपचार घेत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे धोनी डगआऊटमध्येही नसेल असं बोललं जात आहे. त्याच्या गैरहजेरीत संजू सॅमसन विकेटकीपर म्हणून उतरेल यात काही शंका नाही. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच धोनी आणि सुरेश रैनाशिवाय चेन्नई सुपर किंग्स संघ मैदानात उतरणार आहे. यापूर्वी 16 हंगामात असं कधीच झालं नव्हतं. सुरेश रैनाने निवृत्ती घेतल्यानंतर धोनी कायम प्लेइंग 11 चा भाग राहिला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने 2021 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत 4 वर्षे चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी हवी तशी झाली नाही. मागच्या पर्वात तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ सर्वात तळासी होता. यावेळी संघात संजू सॅमसन आला आहे. त्यामुळे संघाची ताकद वाढली आहे. पहिल्या सामन्याच चेन्नई सुपर किंग्स संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. धोनीच्या गैरहजेरीत ऋतुराज गायकवाडला नेतृत्व करायचं आहे. तर संजू सॅमसनवरही यष्टीमागे मोठी जबाबदारी असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *