Headlines

Pakistan Lockdown : अखेर युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन, सगळं काही बंद? युद्धामुळे शाहबाज सरकारने थेट…

Pakistan Lockdown : अखेर युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन, सगळं काही बंद? युद्धामुळे शाहबाज सरकारने थेट…
Pakistan Lockdown : अखेर युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन, सगळं काही बंद? युद्धामुळे शाहबाज सरकारने थेट…


Pakistan Smart Lockdown : आखातातील युद्धामुळे पाकिस्तान देश चांगलाच संकटात सापडला आहे. पाकिस्तान आपल्या इंधनाची गरज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या तेल जहाजांच्या माध्यमातून भागवत होता. परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने या देशाला कच्चे तेल, नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नाहीये. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने तेथे घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलची किंमत गगनाला भिडली आहे. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोक कित्येक तास रांगेत उभे असून लोकांना गॅस सिलिंडर मिळत नाहीये. असे असतानाच आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाचा ड्राफ्टदेखील आता लिक झाला आहे.

पाकिस्तान नेमका काय निर्णय घेऊ शकतो?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान लवकरच लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. तेथील शाहबाज सरकार स्मार्ट लॉकडाऊन लावू शकते. स्मार्ट लॉकडाऊन लावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा तेथील सरकार प्रयत्न करू शकते. त्यासाठीचा एक ड्राफ्टही लिक झाला आहे. त्यानंतर पाकिस्तान सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे. या स्मार्ट लॉकडाऊनसंदर्भातील ड्राफ्ट लीक झालेला असाल तरीही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असे पाकिस्तानी सरकारने सांगितले आहे.

इराण युद्धामुळे परिस्थिती बिघडली?

पाकिस्तानात अगोदरपासूनच महागाई आणि तिजोरी रिकामी असल्याने तेथील लोक हैरान आहेत. असे असतानाच इराण युद्धामुळे तेल आणि गॅस संकट निर्माण झाले आहे. एलपीजी, पेट्रोल, डिझेलची किंमत गगनाला भिडली आहे. पाकिस्तानने या उर्जासंकटातून मार्ग काढण्यासाठी पेट्रोल, डिझेल, गॅसची किंमत वाढवली आहे. पाकिस्तानात 11.67 किलो गॅस सिलिंडरची किंमत 3900 ते 5135 पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढली आहे. अगोदर हाच गॅस 3150 ते 3950 रुपयांना मिळायचा.

दरम्यान, आता पाकिस्तानातील स्मार्ट लॉकडाऊनचा ड्राफ्ट लीक झाल्यानंतर तिथे भविष्यात नेमकं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. युद्ध संपुष्टात न आल्यास तेथील परिस्थिती आणखी भीषण होणार का? हेही पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *