
आपण दररोज घरातून बाहेर पडल्यानंतर ऑफिस किंवा इतर ठिकाणी जातो. तिथे कोणाला ना कोणाला Bye बोलतो. समोरचा लहान असो किंवा मोठा बाय बोलणं आपल्या सवयीचं भाग बनून गेलं आहे. घरातून निघताना, मित्रांना भेटून निरोप घेताना, फोन कट करताना बाय बोलणं अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला Bye शब्दाचा अर्थ, त्याचा फुल फॉर्म, तो कुठून आला? हे माहित आहे का?. bye हा काही नवीन आणि आधुनिक शब्द नाहीय. त्याचा इतिहास जुना आहे. आपण बाय या शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे bye शब्द Goodbye या शब्दाचं छोट आणि सोपं रुप आहे. हा शब्द आपण आपल्या रोजच्या आयुष्यात वापरतो. पण Goodbye हा काही साधारण शब्द नाही. याचं मूळ जुनं इंग्रजी वाक्य God be with you याच्याशी संबंधित आहे.
याचा मराठीत असा अर्थ होतो की, ‘देव तुमच्यासोबत राहो’. पूर्वीच्या काळी कोणाचा निरोप घेताना लोक समोरच्यासाठी शुभकामना व्यक्त करायचे. 14 व्या आणि 16 व्या शतकात हे वाक्य खूप कॉमन होतं. लोक एकमेकांचा निरोप घेताना God be with you बोलून निरोप घ्यायचे. समोरच्याची सुरक्षा आणि भल्याची भावना त्यामागे होती. वेळेबरोबर हे मोठं वाक्य छोटं होऊन Goodbye बनलं. पुढे जाऊन अधिक सोप झालं. BYE शब्द आला. आपल्या रोजच्या भाषेतलं, संवादाचं वाक्य बनलं.
जो शब्द आता आपण रोज वापरतो
वेळेबरोबर Goodbye शब्द छोटा होऊन बाय बनला. सुरुवातीला God be with you बदलून God be with ye झालं. हळूहळू Godbwye आणि अखेरीस Goodbye झालं. पुढे जाऊन Goodbye अजून छोटा होऊन फक्त bye बनला. जो शब्द आता आपण रोज वापरतो.
अजाणतेपणी खूप जुनी आणि सुंदर शुभेच्छा देत आहात
इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की God शब्द बदलून good झाला. Good day आणि Good night या शब्दांशी सहज मेळ खात असल्याने आणि लोकांना हा शब्द स्वीकारणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून हा बाय शब्द बनला. सोशल मीडियावर Bye शब्दाची अनेक मजेशीर रुपं वापरली जातात. जसं की, Be With You Everytime खरं सांगायच झाल्यास Bye शब्दाचा कुठलाही असा फुलफॉर्म ठरलेला नाहीय. त्यामुळे तुम्ही जेव्हा कोणाला bye म्हणालं तेव्हा लक्षात घ्या तुम्ही अजाणतेपणी खूप जुनी आणि सुंदर शुभेच्छा देत आहात.