Headlines

माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा

माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा
माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा


देवेंद्र फडणवीस, नारायण राणे Image Credit source: एजन्सी

Devendra Fadnavis on Narayan Rane: नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्गमध्ये राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महायुतीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खास किस्सा सांगितला. त्याची कार्यक्रमात एकच चर्चा रंगली.

काय होती ती चिठ्ठी

मला सौभाग्य लाभलं, अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत मी त्यांच्यासोबत काम करु शकलो. विधानसभेची कारकिर्दी त्यांच्या नेतृत्वात सुरू केली. त्यावेळी आमच्या महायुतीचे नेते नारायण राणे होते. मला आठवतं, सभागृहात मी पहिलंच भाषण केलं. 7 मिनिटाची संधी मिळाली, पहिलंच भाषण झाल्यानंतर. एक चिठ्ठी माझ्याकडे आली आणि त्यात लिहिलेलं होतं छान बोललास आणि त्यावर नारायण राणे यांची सही होती. मुख्यमंत्री म्हणून मला बाहेरुन पाहायला मिळालं. नारायण राणे आणि मुंढे साहेब यांच्यासोबत काम करायला मिळणं ही पर्वनीच होती. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहनही दिलं, असा किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.

अर्थसंकल्पाचा मुद्देसुद अभ्यास

अर्थसंकल्पावर राणे हे भाषण करायचे त्यावेळी कुठलातरी अर्थतज्ज्ञ बोलतोय असा भास व्हायचा. युतीच्या सरकारने कशा पद्धतीने या ठिकाणी कर्ज वाढवलं असा व्हाईट पेपर मांडण्याचा त्यावेळी प्रयत्न झाला. राणे साहेबांकडे एक सीआयडी खातं त्यावेळी कुठलाही पेपर तयार झाला तो अधिकाऱ्यांच्या आधी त्यांच्याकडे पोहोचायचा. तो व्हाईट पेपर राणे यांच्याकडे आला आणि त्यांनी त्याला उत्तर म्हणून एक भगवी पत्रिका मांडली आणि त्यांची हवा काढली, असे फडणवीस यांनी सांगितले.

मी २००२ साली बजेट कसा वाचावा हे पुस्तक लिहिलं. मी राणे साहेबांकडे गेलो, म्हंटलं दादा असं पुस्तक आहे. ते पब्लिश करायचं आहे. तेव्हा राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांनाही बोलवा, त्यावेळी राणेंनी पुढाकार घेतला. राणे हे ज्यावेळी एका एका विषयावर बोलायचे. त्यावेळी वाभाडे काढणं असं त्यांचं भाषण असायचं. कुठल्याही मंत्र्याने फाईल सही केली की नोट राणे यांच्याकडे असायची. आणि त्याच्यात काही भ्रष्टाचार असला की ते झोडपून काढायचे. आम्ही त्यांचे सैनिक होतो. विरोधी पक्षात असताना आम्ही असे तुटन पडायचो की सत्ताधाऱ्यांना पळताभुई व्हायची कारण आमचे नेते नारायण राणे हे होते.

छगन भुजबळ हे समोर गेल्यानंतर आमच्या बाकावरचे इतका त्रास भुजबळांना द्यायचे. पण छगन भुजबळ हे पुरून उरायचे. पण नारायण राणे हे गेल्यानंतर कुणीही त्रास दिला नाही. राणे साहेब मनाने काँग्रेसमध्ये गेले नव्हते, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. गुणवत्तेमध्ये नाराय़ण राणे कधीच मागे पुढे पहात नाहीत. हजारो लोकांचं जीवन बनवण्याचं काम राणे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांना अधिकार होता त्या अधिकाराचा वापर करणारे तेच होते. प्रत्येक गोष्टी शिस्त असली पाहिजे हा त्यांचा आग्रह, पूर्णवेळ सभागृहात बसणे हा त्यांचा आग्रह असायचा. राणेसाहेब कधी पोटात ठेवू शकले नाही, त्यांच्या भावना तोंडावर सांगण्याचं काम करतात. कोकणातील माणूस फणसासारखा असतो, वरुन काटे आणि आतून गोड असतो.

कोकणाविषयी कनवाळूपणा

देवेंद्र म्हणून मला ते कधी रागावू शकता. निलेश आणि नितेश प्रमाणे मला रागावण्याचा अधिकार आहे. माझ्यावर रागवतात पण त्यांचे प्रेम कमी होत नाही. नितेश किंवा निलेश या दोघांनी राणेंचा वारसा समर्थपणे चालवला आहे. ज्या प्रकारचं बाळकडू त्यांना मिळालं, या दोन्ही तरुण नेत्याचं भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे. आजही बाळासाहेबांचं नाव घेतलं की राणे हे भरभरुन बोलतात. त्यांच्याविषयीची प्रत्येक आठवण भरभरून त्यांच्याकडे आहे, नारायण राणे कुठेही असले तरी ते हिंदुत्व, मराठी माणसांचा आग्रह त्यांनी सोडला नाही. कोकणाच्या विकासाच्या संदर्भात, दिशा देण्याचं काम राणे यांनी केलं. कधीही आम्ही त्यांच्याशी चर्चा करयाला लागलो. तर कोकणाचा जीडीपी, रोजगार संधी कशी वाढवायच्या हाच असतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *