Headlines

पाकिस्तानात हाहाकाराला सुरूवात, वीज पुरवठा खंडीत, तब्बल इतके तास..

पाकिस्तानात हाहाकाराला सुरूवात, वीज पुरवठा खंडीत, तब्बल इतके तास..
पाकिस्तानात हाहाकाराला सुरूवात, वीज पुरवठा खंडीत, तब्बल इतके तास..


इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करत असलेल्या पाकिस्तानमध्ये तीनतेरा वाजले आहेत. पाकिस्तानमधील परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. गॅसची मोठी समस्या पाकिस्तानमध्ये आहे. एलपीजी गॅसचे प्रकल्प जवळपास बंद होण्याच्या स्थितीत आहेत. एकही एलपीजी गॅसचे जहाज पाकिस्तानपर्यंत पोहोचत नाही. पाकिस्तानमध्ये लाईटही नाही. सात तासांपेक्षाही अधिक काळ पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडीत होत आहे. जागतिक स्तरावर ऊर्जेची मोठी समस्या निर्माण झाली. त्यामध्येच पाकिस्तान तेल आणि गॅसच्या समस्येत झुंज देत आहे. आता पाकिस्तानमध्ये लाईटही नाही. पाकिस्तानचे ऊर्जा मंत्री ओवैस लेघारी यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे गॅस पुरवठ्यात समस्या निर्माण झाली. अडथळा निर्माण झाला आहे. ज्यामुळे वीज उत्पादन कमी झाले. याच गोष्टींमुळे देशात 7 तासापर्यंत वीज पुरवठा ठप्प आहे.

पाकिस्तानी मिडियाच्या रिपोर्टनुसार, देशात यावेळी 3400 मेगावाट वीज कमी उत्पादन होत आहे, ज्यामुळे जग संकटात आहे. विजेची कमी असल्याने पाकिस्तानच्या मोठं मोठ्या शहरातही सात तास वीज नाहीये. रात्रीही विजेचा पुरवठा खंडीत होत आहे. कच्च्या तेलाची मोठी समस्या पाकिस्तानमध्ये आहे. हेच नाही तर रात्री 8 च्या अगोदरच बाजारापेठा बंद होत आहेत, तशा सूचना सरकारकडून देण्यात आल्या.

एलपीजीचे संकट पाकिस्तानमध्ये असतानाच आता विजेचीही मारामार पाकिस्तानमध्ये होत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका करत आहे. पण युद्धात मोठा फटका पाकिस्तानला बसताना दिसत आहे. पाकिस्तानमध्ये अगोदरच लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामध्येच गॅस, कच्चे तेल आणि वीजही पाकिस्तानमध्ये नाही. पुढील काही दिवस युद्ध राहिले तर भयंकर परिणाम पाकिस्तानमध्ये दिसू शकतात.

दुसरीकडे युद्धात भारताची रणनिती चांगली राहिली. भारतात एलपीजी गॅसचा थोडाबहुत तुटवडा आहे. पण कच्चे तेल आणि विजेची कोणतीही समस्या अजिबातच नाही. भारतात एलपीजी गॅस आणि कच्चे तेल दाखल होत आहे. रशियातून मोठ्या संख्येने भारतात कच्चे तेल येत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याबद्दल काही घडामोडी घडताना दिसत आहेत. मात्र, ठोस भूमिका अजूनही घेतली जात नाहीये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *