Headlines

Sanjay Raut Press | भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Sanjay Raut Press | भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut Press | भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल


संसदेत सुरू असलेल्या विशेष अधिवेशनादरम्यान महिला आरक्षण विधेयकावर चर्चा रंगली असताना मोठा वाद उफाळून आला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि भाजप खासदार निशीकांत दुबे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. चर्चेदरम्यान सावंत यांनी काही संवेदनशील प्रकरणांचा उल्लेख करत टीका केली असता, दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप केले. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. या घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली.

राऊत म्हणाले, एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष हा महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात, महिलांना त्यांचे हक्क देण्यासंदर्भात एक बिल सर्वानुमते मंजूर करावं अशी भूमिका काल पंतप्रधानांनी मांडली. महिलांच्या आरक्षणामध्ये आणि सुरक्षेच्या मुद्यामध्ये, महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत ज्या भाजपच्या एका नेत्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे आणि तो तुरूंगात आहे. संसदेमध्ये भाजपचा एखादा खासदार जर त्याचं समर्थन करत असेल, तर या आरक्षणाच्या बिलावर चर्चा सुरू होण्याआधी त्यांनी त्या खासदारावर कारवाई केली पाहिजे. जो महिलांवर बलात्कार करून तुरूंगात गेलाय, त्याचं समर्थन पार्लमेंटमध्ये होत असेल तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे याप्रकरणात दिसतंय. आम्हाला या विषयावर आता फार चर्चा करायची नाहीये. आम्ही त्यावर योग्यवेळी भूमिका घेऊ, असं राऊत म्हणाले.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *