Headlines

बापरे! अशोक खरातच्या जवळच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू, चालकाने सांगितलं नेमकं काय घडलं

बापरे! अशोक खरातच्या जवळच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू, चालकाने सांगितलं नेमकं काय घडलं
बापरे! अशोक खरातच्या जवळच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू, चालकाने सांगितलं नेमकं काय घडलं


नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात यांचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारचा एक कंटेनरशी टक्कर झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात डॉ. जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ‘हा खरोखर अपघात आहे की घातपात?’ अशा चर्चांना उधाण आले आहे.

चालक पहिल्यांदाच माध्यमांसमोर

अपघातातील कंटेनर चालक जमाल वारीस याला प्रथमच पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. शनिवारी दुपारी तो कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. चालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, “हैदराबादहून अहमदाबादकडे जात असताना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास कंटेनरचा रेडिएटर पाइप लिक झाल्याने गाडी गरम होत होती. त्यामुळे मी गाडी हळूहळू चालवत होतो. माझा कंटेनर पूर्णपणे थांबलेला नव्हता, तर तो हळूहळू पुढे सरकत होता. त्याच वेळी मागून येणाऱ्या कारने आमच्या कंटेनरला धडक दिली.”

त्याने पुढे सांगितले, “धडकेचा जोरदार आवाज झाला. मी खाली उतरलो, पण काही क्षण काय झाले ते कळलेच नाही. आजूबाजूला पाहिले तेव्हा काही दिसले नाही. थोडे पुढे गेल्यावर कार कंटेनरच्या आत घुसलेली दिसली.”

जितेंद्र शेळके तणावात होते

दरम्यान, डॉ. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू होण्यापूर्वी ते मोठ्या तणावात असल्याचे समोर आले आहे. भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यापासून शेळके हे चिंतेत होते. खरात यांच्या अनेक बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांमध्ये शेळके यांचा सक्रिय सहभाग असल्याचे आरोप होते. तसेच खरात यांच्या अलिशान लॉन्समध्ये शेळकेंची मोठी भागीदारी होती. त्यामुळे “आपल्यावरही कारवाई होईल का?” अशी भीती त्यांना सतत सतावत होती. याच दरम्यान तीन दिवसांपूर्वी त्यांची ईडी (Enforcement Directorate) कडून चौकशी झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांचा अपघात आणि मृत्यू याबाबत चर्चा आणि संशय अधिक तीव्र झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *