Headlines

IPL 2026 Points Table : पंजाब पहिल्या स्थानी कायम, केकेआरच्या विजयामुळे मुंबई सर्वात शेवटी

IPL 2026 Points Table :  पंजाब पहिल्या स्थानी कायम, केकेआरच्या विजयामुळे मुंबई सर्वात शेवटी
IPL 2026 Points Table :  पंजाब पहिल्या स्थानी कायम, केकेआरच्या विजयामुळे मुंबई सर्वात शेवटी


पंजाब किंग्सने रविवारी 19 एप्रिलला घरच्या मैदानात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं. लखनौला 255 धावांचा पाठलाग करताना 200 धावांपर्यंतच पोहचता आलं. पंजाबने यासह आयपीएल 2026 मधील (IPL 2026) एकूण पाचवा विजय मिळवला. पंजाब यासह या मोसमात एकूण 5 सामने जिंकणारी पहिलीच टीम ठरली. तसेच पंजाब आयपीएलमध्ये 6 सामन्यानंतरही एकही सामना न गमावणारी स्पर्धेच्या इतिहासातील पहिलीच टीम ठरली. पंजाबचा केकेआर विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झालेला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला होता. यासह पंजाबच्या खात्यात 11 गुण झाले. पंजाबने अशाप्रकारे 19 व्या मोसमातील 29 सामन्यांनंतर पॉइंट्स टेबलमधील पहिलं स्थान कायम राखलं.

पंजाबच नंबर 1

पंजाब विरुद्ध लखनौ सामन्याआधी रविवारी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात कोलकाताने मोहिमेतील सातव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर मात करत विजयाचं खातं उघडलं. केकेआरला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला. केकेआरच्या पहिल्या विजयामुळे मुंबईची सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी घसरण झाली. या डबल हेडरमधील दोन्ही सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ झालीय. या दोन्ही सामन्यांनंतर कुणाच्या खात्यात किती गुण आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात.

आरसीबी आणि राजस्थान अपयशी ठरल्याने पंजाबला अव्वल स्थान कायम राखण्यात मदत झाली. शनिवारी आरसीबीला 18 एप्रिल दिल्ली कॅपिट्ल्सकडून पराभूत व्हावं लागलं. तर रविवारी रियान पराग याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सला कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केलं. केकेआरने यासह पहिला विजय नोंदवला. तर सलग 4 सामने जिंकणाऱ्या राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. त्यामुळे पंजाब आता 6 सामन्यानंतर 11 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. पंजाबला विजयानंतर नेट रनरेटमध्येही फायदा झालाय. पंजाबचा नेट रनरेट हा सामन्याआधी +1.067 असा होता जो विजयानंतर +1.420 इतका झाला आहे. तर बंगळुरु आणि राजस्थानच्या खात्यात 6 सामन्यानंतर प्रत्येकी 8-8 गुण आहेत. बंगळुरु आणि राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.

पंजाबला रोखणं अशक्य, पॉइंट्स टेबलमधील दबदबा कायम

मुंबई दहाव्या स्थानी

केकेआरने आपल्या मोहिमेतील सातव्या सामन्यात राजस्थानवर 4 विके्टसने विजय मिळवला. केकेआरने यासह एका स्थानाची झेप घेतली. त्यामुळे केकेआर नवव्या स्थानी पोहचली. तर नवव्या स्थानी असलेली मुंबईची सर्वात शेवटी दहाव्या स्थानी घसरण झाली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *