Headlines

Supriya Sule | सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद, म्हणाल्या माझी इच्छा होती की…

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांगता सभा पार पडली असून, या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. भाषणात सुळे यांनी सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपली इच्छा व्यक्त केली होती, असं सांगितलं. “निवडणूक जाहीर झाल्याच दिवशी मी माध्यमांमध्ये बोलले होते की, सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र काही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने आता मतदान होणार आहे,” असं सुळे म्हणाल्या. तरीही या निवडणुकीत विक्रमी मतदान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुळे यांनी मतदारांना आवाहन करत, “पहिल्या क्रमांकावर असलेलं सुनेत्रा पवार यांचं बटन दाबून त्यांना विजयी करा. तसेच अजित पवार यांना आदरांजली देत सुनेत्रा वहिनींना साथ द्या,” असं भावनिक आवाहन केलं. या वक्तव्यामुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिक तापलं असून, पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *